राज्यभराला लागलं ‘सैराट’चं याड

sairat1

sairat1
अपेक्षेप्रमाणेच आज दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अनेक जण चित्रपटाचा पहिलाच शो बघण्यासाठी उत्सुक होते. अनेकांनी सकाळी नऊचा शो बुक केला होता. तर आज दिवसभरातील शोही वेगात बुक होत आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक शहरात चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. फँड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा चित्रपट आहे. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच चित्रपटात रिंकू राजगुरु या उभरत्या अभिनेत्रीने या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.

The post राज्यभराला लागलं ‘सैराट’चं याड appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

‘महाराष्ट्र दिन’ काळा दिवस म्हणून साजरा करणार

shrishari-aney

shrishari-aney
नागपूर – विदर्भवाद्यांच्या बैठकीत ‘१ मे’ हा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाल्याची माहिती श्रीहरी अणे यांनी दिली. सर्व विदर्भवादी संघटना मिळून ‘१ मे’ला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवणार असल्याचेही अणेंनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाच्या भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर अणे पत्रकारांशी बोलत होते.

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून यापुढे आमच्यावर हल्ला झाला तर प्रतिकार करू, शांत बसणार नाही, असा इशारा अणेंनी यावेळी दिला. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें यांच्यासोबत चर्चा करून त्यांना वेगळ्या विदर्भाचे महत्त्व पटवून द्यायला तयार आहे. यासंदर्भात मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्ही विदर्भाचा विकास करू शकलो नाही तर स्वत:हून विदर्भ स्वतंत्र करू, असे आश्वासन दिले होते, असे सांगितले.

The post ‘महाराष्ट्र दिन’ काळा दिवस म्हणून साजरा करणार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

हार्बर मार्गावरील १२ डबा गाड्यांचे वेळापत्रक

हार्बर मार्गावरील १२ डबा गाड्यांचे वेळापत्रक

हार्बरवर १२ डब्यांची लोकल प्रत्यक्षात धावण्यास सुरुवात झाली असून दिवसाकाठी १४ फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवराज सोबतच्या नात्यासंदर्भात प्रिती झिंटाने केला खुलासा

preity-zinta

preity-zinta
अभिनेत्री प्रिती झिंटाने भारतीय क्रिकेट टीममधील सर्वात प्रभावशाली फलंदाजांपैकी एक असलेल्या युवराज सिंह याच्यासंदर्भातील नात्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. एकेकाळी युवराज सिंह आणि ब्रेट ली यांना प्रीती झिंटाचे बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, प्रिती झिंटाने त्यांच्या नात्याबाबत एक माहिती उघड केली आहे.

युवराज सिंह हा आयपीएलमध्ये प्रिती झिंटाच्या ‘किंग्स इलेव्हन पंजाब’ या टीममधून खेळत होता त्यावेळी युवराज आणि प्रिती झिंटा यांच्यात अफेअर असल्याची जोरदार चर्चा केली जात होती. ज्यावेळी युवराज सिंह हा दुस-या क्रिकेट टीममधून खेळण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर प्रिती झिंटाचे नाव ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट ली सोबत जोडले गेले.

प्रिती झिंटाने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. युवराजच नाही तर ब्रेट ली हा सुद्धा आपल्या भावासारखा आहे. प्रिती झिंटाने म्हटले आहे की, मला खासगी आयुष्याविषयी फारसे बोलणे पसंत नाही. ज्यावेळी कुणी माझ्यासंदर्भात एखादी गोष्ट कन्फर्म न करता काहीही लिहितो, त्यावेळी मला फार विचित्र वाटतं. आता मात्र मला त्रास दिला जात नाही. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या मी मनावर घेतल्या आहेत. जेव्हा माझे नाव युवराज आणि ब्रेट लीसोबत जोडले गेले होते, तो काळ मी कधीच विसरु शकत नाही. हे दोघेही मला माझ्या भावासारखे आहेत. दरवर्षी मी त्यांना राखी बांधत असते.

काही दिवसांपूर्वी प्रिती झिंटाला पत्रकारांनी युवराजच्या लग्नाची तारिख विचारली होती. त्यावेळी तीने म्हटले होते की, तुम्हाला माहिती आहे का? लग्न कधी आहे. मी हे यासाठी विचारत आहे, कारण स्पेशल गिफ्ट म्हणून मी राखी घेऊन जाईल. युवराज लग्न करतोय, याचा मला आनंद आहे. आमचे बाँडिंग खूप चांगले आहे. तो माझ्या टीमचा एक भाग होता आणि आम्ही दोघांनीही आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

The post युवराज सोबतच्या नात्यासंदर्भात प्रिती झिंटाने केला खुलासा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

मुंबईत फिरणार ‘कसिनो’ची चक्री ?

casino

casino
मुंबई : मुंबईच्या समुद्र किनारी लवकरच कसिनो सुरू होण्याची चिन्हे आहेत. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तसा प्रस्ताव ठेवला असून कसिनोला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्य सरकारला समुद्र किनारी कसिनो सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती एका प्रस्तावाद्वारे केली आहे. या कसिनोमध्ये सुरूवातीस फक्त परेदशी पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आहे. कसिनोला विविध स्तरांतून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेवून सुरूवातीच्या टप्प्यांत सरकारनेच हे कसिनो चालवावेत असे एमटीडीसीने म्हटले आहे. ही कल्पना यशस्वी झाल्यास कालांतराने खाजगी उद्योजकांना त्याचे परवाने देवून भारतीयांनाही कसिनोत प्रवेश द्यावेत अशी सुचनाही या प्रस्तावात करण्यात आली आहे. मात्र हे कसिनो नेमके कुठे असावेत याबाबत एमटीडीसीने काहीही सुचवले नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. सध्या केवळ गोवा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये कसिनोला परवानगी आहे. मात्र, एमटीडीसीने राज्यसरकारसमोर हा प्रस्ताव ठेवला असला तरी नेहमीच भाजपला विरोध करणारा पक्ष शिवसेना व घटक पक्षांचा याला विरोध होण्याची शक्यता आहे. महसुल मिळविण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यासाठी कसिनो सुरू करण्याची गरज नाही हा प्रस्ताव मंत्रीमंडळात आला तरी त्याना विरोध होईल असे एका भाजप नेत्याने म्हटले. सरकारमधील एका वरिष्ठ अधिका-याने मात्र या मंत्र्याचा युक्तिवाद धुडकावून लावला. सरकारने लॉटरीला परवानगी दिली आहे.

The post मुंबईत फिरणार ‘कसिनो’ची चक्री ? appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

‘एक अलबेला’चा टायटल व्हिडिओ रिलीज

ek-albela

ek-albela
भारतीय सिनेसृष्टीतील पहिले डान्सिंग स्टार म्हणून ओळखले जाणारे भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असून ‘एक अलबेला’ असे टायटल असलेल्या या चित्रपटाचे टायटल व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटात भगवान दादा यांची भूमिका अभिनेता मंगेश देसाई याने साकारली असून प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांची भूमिका विद्या बालन यांनी साकारली आहे. विद्या बालन या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सरतांडेल यांनी केले असून हा चित्रपट येत्या १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

The post ‘एक अलबेला’चा टायटल व्हिडिओ रिलीज appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

राज्यसभेतील आकर्षणाचे केंद्र

subramaniam-swami

subramaniam-swami
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेऊन राज्यसभेवर नेमले आहे. त्यांची ही नियुक्ती होण्याआधीच ते राज्यसभेमध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होणार असे अंदाज व्यक्त केले जातच होते आणि त्यांनी त्याची झलकही दाखवली. नियुक्तीनंतरच्या पहिल्या दोन दिवसातच त्यांनी राज्यसभेत कॉंग्रेसला अस्वस्थ करून सोडले. त्यांच्या सुदैवाने म्हणा की कॉंग्रेसच्या दुर्दैवाने म्हणा त्यांनी सदस्यत्त्वाची शपथ घेताच इटलीतील हेलिकॉप्टर खरेदीचे प्रकरण उद्भवले आणि सोनिया गांधीवर शरसंधान साधण्याची संधी मिळाली. ती संधी साधत सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधींचे नाव घेऊन आरोप केला. संसदेत केलेल्या अशा आरोपावरून अब्रु नुकसानीचा दावा करता येत नाही. त्याचा लाभ उठवत सोनिया गांधी यांना अस्वस्थ करून सोडले आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनाही संतप्त केले.

गेले दोन तीन दिवसतरी राज्यसभेत सुब्रमण्यम स्वामीच गाजत आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना आनंद होत असेल कारण डॉ. स्वामी हे अशी विचित्र पीडा आहे की ती कोणा ना कोणाच्या मागे लागते तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना आनंद होतो. तेव्हा आता सोनिया गांधी यांच्या मागे लागल्यामुळे भाजपच्या नेत्यांना आनंद होत आहे. पण सुब्रमण्यम स्वामी हा विचित्र माणूस भाजपाच्या मागे हात धुवून कधी लागेल याचा काही नेम सांगता येत नाही. भारताच्या राजकारणात ऍड. राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी ही अशी दोन माणसे आहेत की ज्यांना वन मॅन आर्मी म्हटले जाते. ते कोणत्याही पक्षात जातात आणि काय वाटेल ते करतात. मात्र आपल्या अभ्यासूपणाने राजकारणात नव्या लाटा निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात असल्याने त्यांना सगळेच टरकून असतात.

डॉ. स्वामी मुळात जनसंघात होते आणि त्यांना १९७४ साली जनसंघाने राज्यसभेवर घेतले होते. याच काळात आणीबाणी आली. आणीबाणीत सुब्रमण्यम स्वामी यांनी चांगले काम केले पण आणीबाणी नंतरच्या मोरारजी मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली नाही. त्यांची उपेक्षा होत गेली आणि ते सातत्याने पक्ष बदलत गेले. शेवटी १९९१ साली जनता पार्टीचे सदस्य म्हणून ते चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात आले. त्यांनी १९९८ साली सोनिया गांधींना हाताशी धरून वाजपेयी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले परंतु हे कारस्थान करत असताना त्यांची सोनिया गांधी आणि जयललिता यांच्याशी जुळलेली मैत्री तुटली. त्यामुळे त्यांनी या दोघींना जेलमध्ये पाठवण्याची प्रतिज्ञा केली आहे. जयललितांना त्यांनी तुरुंगवास घडवला आहेच आता ते सोनिया गांधी यांच्या मागे लागले आहेत.

The post राज्यसभेतील आकर्षणाचे केंद्र appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

पोलिस उपनिरीक्षकाचा तरुणीवर बलात्कार

rape

rape
पुणे : लग्नाचे आमीष दाखवून एका पोलिस उपनिरीक्षकाने २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष सोनवणे (३०, रा. हडपसर, पुणे) असे अत्याचार करणा-या पोलिस अधिका-याचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात सोनवणेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोनवणेला अटक केली आहे.

याबाबतची माहिती अशी की, संतोष सोनवणे हा सध्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे पोलिस उपनिरीक्षकपदावर कार्यरत आहे. तर त्याची पत्नी पुण्यात नोकरी करते. सुटीच्या काळात सोनवणे पत्नीला भेटण्यासाठी पुण्यात अधूनमधून यायचा. याचदरम्यान, सोनवणेची त्याच्या सास-याच्या मित्राशी ओळख झाली. त्यांना एक २० वर्षांची मुलगी आहे. मुलीला चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळवून देतो म्हणून त्याने तिच्याशी ओळख वाढविली. पुढे संतोष सोनवणेने तिच्याशी जवळिक साधत लग्नाचे आमीष दाखवले व अत्याचार करण्यास सुरुवात केली. मागील पंधरवड्यात त्याने संबंधित मुलीला मुंबईत बोलवून घेतले. तसेच भाड्याच्या फ्लॅटमध्ये बंद करून ठेवले. इकडे, तरुणीच्या पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी तिचा मोबाईल मुंब्रा येथे असल्याचे सांगितले.

The post पोलिस उपनिरीक्षकाचा तरुणीवर बलात्कार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

आता अॅप न उघडताच व्हॉट्सअॅपवरून करा ‘कॉल बॅक’

whatsapp

whatsapp
नवी दिल्ली- आता लवकरच व्हॉट्सअॅपचे अॅप्लिकेशन न उघडता फक्त मोबाईलच्या स्क्रीनवरूनच व्हॉट्सअॅपवरून ‘कॉल बॅक’ करणे शक्य होणार आहे. ही सुविधा अॅपलच्या आयओएस आणि अँड्रॉइड मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

याचा फायदा व्हॉट्सअॅपची व्हॉइस कॉल सुविधेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. नेहमीच्या कॉलिंगप्रमाणे व्हॉट्सअॅप कॉलचेही नोटिफिकेशन येथे त्याच्या बाजूलाच हे कॉलबॅकचे बटन दिले जाणार आहे. फोन रडार या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप न उघडता कॉल बॅक करण्याची सुविधा सुरू होणार आहे. तसेच, अॅपलच्या वापरकर्त्यांसाठी व्हॉईस मेलची सुविधाही सुरू होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

The post आता अॅप न उघडताच व्हॉट्सअॅपवरून करा ‘कॉल बॅक’ appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

एमबीएच्या केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या

mba

mba
नवी दिल्ली- पदवीचे शिक्षण संपवून बिझनेस स्कूलमधून एमबीए करून गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याची अनेक तरुण तरुणींची इच्छा असते परंतु त्यांच्या या विचारसरणीस तडा देणारा एक अहवाल समोर आला आहे.

काही प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालये आणि विद्यापीठांचा अपवाद वगळता इतर बिझनेस स्कूल सुमार दर्जाचे पदवीधर तयार करीत असून ते रोजगार मिळवण्यास अपात्र असल्याचे दिसून आले आहे. बिझनेस स्कूलची संख्या बेसुमारपणे वाढल्याने विद्यार्थ्यांना रोजगार मिळणासा झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांनी नोकरी मिळवली त्यांना १०,००० रुपयांपेक्षा कमी पगार मिळत आहे. असे आसोकामने म्हटले आहे.

बिझनेस स्कूलच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उचलत आसोकाम एज्यकेशन कमिटीने मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. केवळ सात टक्के व्यवस्थापन शास्त्रातील पदवीधरानांच नोकऱ्या मिळत आहेत. भारतात किमान ५,५०० बिझनेस स्कूल्स आहेत. त्यापैकी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद, लखनौ, हैदराबाद, देहरादून या शहरातील २२० बी-स्कूल्स बंद झाल्याचे या अहवालात म्हटले आहे तर शहरातील किमान १२० बी-स्कूल्स काही काळातच बंद होतील असे अहवालात म्हटले गेले आहे. २०१४-१६ या काळात कॅम्पस रिक्रूटमेंट म्हणजेच परिसर भरती ४५ टक्क्यांनी घटली आहे.

The post एमबीएच्या केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.