‘नीट’बाबत आता गुरुवारी होणार सुनावणी

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली

‘नीट’विरोधात महाराष्ट्रासह आठ राज्यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकांवर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने त्यांचं म्हणणं मांडावं, असे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने दिले. येत्या गुरुवारी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असून मेडिकल कौन्सिलची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्ट या सर्व याचिकांवर एकत्रित निर्णय देणार आहे. त्यामुळे ‘नीट’ की ‘सीईटी’ अशा पेचात सापडलेल्या विद्यार्थ्यांचे डोळे गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (नीट) अंमलबजावणी २०१८ पासून करण्यात यावी आणि तूर्त राज्यांना आपली वैद्यकीय प्रवेश परीक्षा स्वतंत्रपणे घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या फेरविचार याचिका महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांनी केल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला राज्यांनी केलेल्या अर्जांवर गुरुवारी उत्तर देण्याचे निर्देश दिले. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ‘नीट’बाबत अंतिम निर्णय आता गुरुवारीच होईल, अशी शक्यता आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ मे ला भारतात लाँच होणार होंडा BR-V

honda-br-v

honda-br-v
मुंबई – दिल्लीतील ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये होंडा BR-V या गाडीला शोकेस करण्यात आले होते. आता भारतात ५ मे रोजी या कॉम्पेक्ट एसयुवीला लाँच करण्यात येणार आहे.

कंपनीने होंडा BR-V या गाडीची बुकिंग देखील सुरू केली आहे. या गाडीला बुक करण्यासाठी ग्राहकांना २१ हजार रूपये जमा करावे लागणार आहे. होंडा BR-Vची किंमत ८ लाखापासून सुरू होऊन ती १२ लाखापर्यंत आहे. या कारची टक्कर रेनॉ डस्टर, निसान टेरानो, महिन्द्रा स्कॉर्पियो, टाटा सफारी आणि ह्यूंदै क्रेटा सोबत होणार आहे.

होंडा BR-V ला ब्रियो आणि अमेजप्रमाणेच मोबिलियोच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. मात्र एक्सटीरियर आणि इंटिरियरच्या तुलनेत ही कार वेगळी आहे. होंडा BR-V ही होंडा सिटीप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेल इंजिनवर आहे. पेट्रोल वर्जनमध्ये १.५ लीटरचे आय विकेट इंजिन आणि जिझेल वेरियंटमध्ये १.५ लीटरचे आय डिटेक इंजिन उपलब्ध आहे. या गाडीचे कॉम्पेक्ट एसयूवीचे रियर प्रोफाईल देखील उत्तम आहे. ओवरऑल लुक्ससाठी ही गाडी उत्तम आहे.

गाडीचे डॅशबोर्ड स्टाईलिश करण्यासाठी एसी वेंटसच्या चारही बाजूला अॅल्युमिनियम फिनिशवाली पट्टी आणि सेंटर कंसोलवर ग्लॉसी ब्लँक फिनिश देण्यात आली आहे. गाडीमध्ये कॉम्पॅक्ट एसयूवीमध्ये एबीएस, ईबीडी, ड्यूल फ्रंट एअरबॅग, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माऊंटेड कंट्रोल्स, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल आणि प्रोजेक्टर हँडलँप्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

The post ५ मे ला भारतात लाँच होणार होंडा BR-V appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

अवघ्या तीन मिनिटात पोहोचा सप्तश्रुंगीगडावर

saptshrungi

saptshrungi
नाशिक : आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉली उभारण्याच्या कामाला वेग आल्यामुळे तुम्ही आता तीन मिनिटात पोहोचून देवीचे दर्शन घेऊ शकता. फ्युनिक्यूलर ट्रॉली या ट्रॅकवर चढविल्या आहेत. त्यांची चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे.

या ट्रॉल्या कोलकाता येथून आणण्यात आल्या असून, संपूर्णपणे वातानुकूलित या ट्रॉलीला जाण्या-येण्यासाठी कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून चाचणी घेण्यासाठी परदेशातून अभियंते बोलविण्यात आले आहेत. फ्युनिक्यूलर ट्रॉली हा देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. यामुळे महिला, अपंग वृद्ध, भाविकांची गैरसोय थांबून त्यांचा मंदिरापर्यंतचा प्रवास सुखकर आणि अवघ्या तीन मिनिटात होणार आहे.

डोंगरकडय़ाच्या मध्यभागी आणि पायथ्यापासून १०० मीटर उंचीवर सप्तशृंगी देवीचे मंदिर असून, भाविकांना मंदिरात ५५० पायऱ्या उंच चढून जावे लागते. फ्युनिक्यूलर ट्रॉलीचा पर्याय शोधण्यात आला. ही ट्रॉली १.५ मीटर रुंदीच्या आणि २५० मीटर लांबीच्या रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रेनसारखी असणार आहे. विद्युतीकरणावर चालणारी ही ट्राली सिस्टीम डोंगरात उभारली गेली असून, येथेही कोकण रेल्वे पॅटर्ननुसार संरक्षणाची सोय करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रवासी प्रतीक्षालय, बुकिंग ऑफिस, स्टाफ रूम, वेटिंग प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह, शौचालय, हॉटेल आदी सुविधा असणार आहेत.

The post अवघ्या तीन मिनिटात पोहोचा सप्तश्रुंगीगडावर appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

हा आहे बुचार्डचा फिटनेस फंडा

bouchard

bouchard
न्यूयॉर्क – कॅनडाची स्टार टेनिस खेळाडू यूजिन बुचार्ड पूर्ण दिवस फिट राहण्यासाठी न्याहारीत केळे आणि अंडी खाने पसंत करते. या टेनिस स्‍टारच्या म्हणण्यानुसार अंडी आणि केळी न्याहारीसाठी स्‍वस्‍थ आहे आणि पूर्ण दिवस फिट राहण्यासाठी हेच महत्वपूर्ण आहे. पुढे बुचार्ड सांगते की, मला जेवण बनवायला आवडत नाही म्हणून माझा फ्रीज नेहमीच रिकामी असतो. गरज भासल्यास मी जेवण बनवते. मी माझी न्याहारी स्वतःच बनवते. प्रोटीनसाठी मी रोज सकाळी अंडी खाते आणि संत्र्याचा ज्यूस घेते.

जिम ट्रेनिंगमध्ये काही वेळ घालवणारी आणि दररोज चार तास टेनिसचा सराव करणाऱ्या बुचार्डने नुकतीच अमेरिकन मॅगझीन ‘सेल्फ’ला दिलेल्या मुलाखतीत माझ्याजवळ माझे ऍनर्जी बार्स आणि ऍनर्जी जेल्‍स (हातावर लावण्यासाठी) आहते. सर्व टेनिस खेळाडू एक दिवसात कमीत कमी पाच केळी खातात. त्याच बरोबर अति मेहनत आणि विश्राम यामध्ये योग्य संतुलन बनवणे गरजेचे असते असे बुचार्ड सांगते. एवढेच नाही तर योग्य झोप देखील माझ्या फिटनेसचा एक भाग आहे.

The post हा आहे बुचार्डचा फिटनेस फंडा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

पुण्यात पाण्यावरून मनसेचं ‘खळ्ळ-खटॅक’, बापट लक्ष्य

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यामधून तब्बल एक अब्ज घनफूट पाणी दौंड आणि इंदापूरला सोडण्याच्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निर्णयानं संतापलेल्या मनसैनिकांनी आज पुण्यात ‘खळ्ळ खटॅक’ स्टाइल आंदोलन करून आपला निषेध नोंदवला. जलसंपदा विभागाच्या पुणे क्षेत्राचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्या कार्यालयात शिरून मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

गेले आठ महिने पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीकपात सोसावी लागतेय. असं असूनही, खडकवासला धरणातून दौंड व इंदापूरसाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गिरीश बापट यांनी काल घेतला. त्याबद्दल पुण्यात नाराजी व्यक्त होतेय. दोन लाडक्या आमदारांचा हट्ट पुरवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुणेकरांचं हक्काचं पाणी पळवल्याची चर्चा आहे. खडकवासला धरणातून फक्त दौंडला पाणी देण्यात यावे, इंदापूरसाठी उजनी धरणातून पाणी घेणे शक्य आहे, असं जिल्हा प्रशासनाने कळवलं होतं. त्या सूचनेला बापट यांनी केराची टोपली दाखवल्यानं पुण्यात पाणी ‘पेटण्या’ची चिन्हं होती.

त्यानुसारच, आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जलसंपदा विभागाच्या पुण्यातील कार्यालयाला लक्ष्य केलं. तिथल्या काचा फोडून लाकडी फर्निचरची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर या कार्यालयाला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

महापालिकेतही पालकमंत्री ‘टार्गेट’

दौंड आणि इंदापूरला पाणी सोडण्याच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी पालकमंत्र्यांचा निषेध करत राजीनाम्याची मागणी केली आहे. महापौरांसह सर्वपक्षीय नेते जिल्हाधिऱ्यांची भेट घेऊन या मुद्दयावर चर्चा करणार आहेत.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्यावर होणाऱ्या टीकेमुळे आनंद: राहुल गांधी

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली

ऑगस्टा वेस्टलँडपाठोपाठ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या घोटाळ्याशी राहुल गांधींचे नाव भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी जोडले आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अशा घोटाळ्यांशी आपले नाव जोडल्यामुळे आनंद झाल्याचे राहुल यांनी सांगितले. मला नेहमीच टार्गेट केले जाते, त्यामुळे याचा मला आनंदच आहे, की माझ्यावर टीका होते, असे राहुल म्हणाले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या एका बांधकाम व्यवसायिक आणि राहुल गांधी यांच्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी खासदार किरीट सोमय्या यांनी सीबीआय आणि ईडीकडे केली होती. तसेच ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात राहुल गांधी यांचा राजकीय सहाय्यकाचा सहभाग असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

दरम्यान, सोमय्या यांनी सीबीआयकडे आणि ईडीकडे पत्राद्वारे केलेले आरोप खोटे असल्याचे राहुल गांधी यांचे सहाय्यक कनिष्क सिंह यांनी सांगितले. केवळ राजकारणासाठी हे आरोप करण्यात आल्याचे सिंह म्हणाले.

दुसरीकडे राहुल यांच्या प्रतिक्रियेवर भाजपकडून लगेच उत्तरही देण्यात आले. ‘चूक केली आहे तर त्याच्यावर टीका होणारच’, असे केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह म्हणाले. राहुल गांधी यांनी ईडीसमोर हजर व्हावे, असा सल्लाही सिंह यांनी दिला.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गळाभेट घ्यायला केजरीवाल हिरोईन आहेत का?’

मटा ऑनलाइन वृत्त। रेवाडी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मी बळजबरीनं गळाभेट घेण्यासाठी ते काय मुंबईची हिरोइन आहेत का?, असा प्रश्न करत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी आज आपल्या खास स्टाइलमध्ये त्यांची खिल्ली उडवली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात लालूप्रसाद यादव आणि अरविंद केजरीवाल यांची गळाभेट घेतल्याचा फोटो ‘व्हायरल’ झाला होता. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चाही रंगली होती. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या लालू – केजरीवाल यांच्या गळाभेटीमागे दडलंय काय, यावरून बरेच तर्कवितर्क लढवले गेले होते. या गळाभेटीबाबत प्रसारमाध्यमांनी केजरीवाल यांना छेडलं असता, लालूप्रसाद यांनी स्वतःहूनच बळजबरीनं ही गळाभेट घेतली होती, असा दावा त्यांनी केला होता. त्यावरूनच आज लालूंनी केजरींची टर उडवली.

तुम्ही जबरदस्तीनं गळाभेट घेतल्याचं केजरीवाल म्हणतात ते खरं आहे का?, असं विचारताच, मी बळजबरी गळाभेट घ्यायला केजरीवाल काय मुंबईची हिरोईन आहेत का, असा प्रतिप्रश्न लालूंनी केला आणि एकच हशा पिकला.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हा आहे बुचार्डचा फिटनेस फंडा

न्यूयॉर्क – कॅनडाची स्टार टेनिस खेळाडू यूजिन बुचार्ड पूर्ण दिवस फिट राहण्यासाठी न्याहारीत केळे आणि अंडी खाने पसंत करते. या टेनिस स्‍टारच्या म्हणण्यानुसार अंडी आणि केळी न्याहारीसाठी स्‍वस्‍थ आहे आणि पूर्ण दिवस फिट राहण्यासाठी हेच महत्वपूर्ण आहे. पुढे बुचार्ड सांगते की, मला जेवण बनवायला आवडत नाही म्हणून माझा फ्रीज नेहमीच रिकामी असतो. गरज भासल्यास मी जेवण बनवते. मी माझी न्याहारी स्वतःच बनवते. प्रोटीनसाठी मी रोज सकाळी अंडी खाते आणि संत्र्याचा ज्यूस घेते.

जिम ट्रेनिंगमध्ये काही वेळ घालवणारी आणि दररोज चार तास टेनिसचा सराव करणाऱ्या बुचार्डने नुकतीच अमेरिकन मॅगझीन ‘सेल्फ’ला दिलेल्या मुलाखतीत माझ्याजवळ माझे ऍनर्जी बार्स आणि ऍनर्जी जेल्‍स (हातावर लावण्यासाठी) आहते. सर्व टेनिस खेळाडू एक दिवसात कमीत कमी पाच केळी खातात. त्याच बरोबर अति मेहनत आणि विश्राम यामध्ये योग्य संतुलन बनवणे गरजेचे असते असे बुचार्ड सांगते. एवढेच नाही तर योग्य झोप देखील माझ्या फिटनेसचा एक भाग आहे.

The post हा आहे बुचार्डचा फिटनेस फंडा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

सलमान आणि ‘सुलतान’च्या दिग्दर्शकाविरोधात तक्रार

salman

salman
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि ‘सुलतान’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुझफ्फरनगरच्या मोरना परिसरात ‘सुलतान’मधील काही सीन्स चित्रित करण्यात आले आहेत. पण चित्रपटात ते ठिकाण हरियाणातील रेवडी असल्याचे दाखवण्यात आले आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारकर्त्याचे नाव एहतेशाम सिद्दीकी असे आहे. या गोष्टीमुळे मुझफ्फरनगरच्या नागरिक संतापले आहेत, असा दावा सिद्दीकी यांनी केला आहे.

The post सलमान आणि ‘सुलतान’च्या दिग्दर्शकाविरोधात तक्रार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

आता सचिनही रिओ ऑलिंपिकचा सदिच्छा दूत

sachin-tendulkar

sachin-tendulkar
नवी दिल्ली – भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचीही सदिच्छा दूत (गुडविल ऍम्बेसिडर) म्हणून निवड केली आहे.

भारतीय ऑलिंपिक संघटनेने रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय संघासाठी सदिच्छा दूत करण्यासाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान व नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्यानंतर आता सचिनची निवड केली आहे. सचिननेही आयओएची ही विनंती मान्य करत सदिच्छा दूत बनण्याची तयारी दर्शविली आहे.

आयओएवर सलमान खानची सदिच्छा दूतपदी निवड केल्यानंतर टीका करण्यात आली होती. त्यानंतर अभिनव बिंद्रा आणि आता सचिन तेंडुलकर या क्रीडापटूंची निवड करण्यात आल्याने वाद मिटण्याची शक्यता आहे. संगीतकार ए. आर. रेहमान यांनाही सदिच्छा दूत होण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे.

The post आता सचिनही रिओ ऑलिंपिकचा सदिच्छा दूत appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.