राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना आर्चीला भासली एक उणीव

rinku-rajguru

rinku-rajguru
नुकताच रिंकू राजगुरूला ‘सैराट’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. तिचे सोशल मिडियातून भरभरून कौतुकही करण्यात आले. पण जेव्हा रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला तेव्हा तिला एक उणीव भासत होती. ती म्हणजे नागराज मंजुळे यांची.

रिंकूने पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. रिंकूचे या चित्रपटासाठी ऑडिशनच्या माध्यमातून सिलेक्शन करण्यात आले हे तर सर्वांनाच माहिती आहे. तिच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. नुकताच तिला पुरस्कार दिला गेला. तिच्यासोबत तिचे आई वडीलही होते. पण एक व्यक्ती नव्हती ती म्हणजे या चित्रपटात तिच्याकडून सर्व काम करून घेणारा प्रतिभावंत दिग्दर्शक नागराज मंजुळे. रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल हे मला माहित असल्याचे नागराजने अनेक मुलाखतींमधून आधीच सांगितले होते.

रिंकूला ज्या दिवशी पुरस्कार मिळाला त्या दिवशी तिला प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा तिने सांगितले की, या सगळ्या प्रवासात माझ्या सोबत खंबीरपणे राहिलेला नागराज दादा काल सोबत नव्हता याचे मला फार दुःख झाले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रिंकूचे वडील महादेव राजगुरु आणि आई आशा राजगुरु देखील दिल्लीला तिच्यासोबत गेले होते. राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर रिंकू जेव्हा तिच्या आई-वडिलांकडे गेली तर त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

दरम्यान, पहिल्या आठवड्यात म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल १२.२० कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या आठवड्याला इतकी कमाई करणारा हा मराठीतील पहिला चित्रपट ठरला आहे. यानंतर सोमवारी या चित्रपटाने २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यापूर्वी ‘नटसम्राट’ चित्रपटाने एका आठवड्यात १६ कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा ‘नटसम्राट’ २२ कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा ३५ कोटींच्या घरात गेला होता.

The post राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना आर्चीला भासली एक उणीव appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

अम्मा देणार मोफत मोबाईल आणि १०० युनिट वीज

jaylalitha

jaylalitha
पेरुनदुराई – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सर्व रेशनकार्डधारकांना विनामूल्य भ्रमणध्वनी आणि १०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन देतानाच सत्तेवर आल्यास सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.

जयललिता यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांची संयुक्त जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याच्याच दिवशी येथे जाहीर सभेतच जाहीरनामा प्रसिद्ध केला. विविध क्षेत्रांचा अंतर्भाव असलेल्या अनेक लोकप्रिय उपाययोजनांचा समावेश जाहीरनाम्यात आहे. सर्व रेशनकार्डधारकांना विनामूल्य मोबाईल अभाअद्रमुक पुन्हा सत्तेवर आल्यास उपलब्ध करून दिला जाईल, असे त्या म्हणाल्या.

घरातील किमान एका सदस्याला व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे. सध्याच्या मोजणी पद्धतीवर आधारित प्रत्येक घरात १०० युनिट वीज मोफत उपलब्ध करून दिली जाईल, त्याचा लाभ ७८ लाख ग्राहकांना होईल, त्यांना वीजबिल भरण्याची गरजच राहणार नाही, असे त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप योजना सुरू ठेवण्यात येईल आणि त्यासमवेत मोफत इंटरनेट जोडणीही देण्यात येईल, असे जयललिता यांनी जाहीर केले. मातृत्व योजनेसाठी देण्यात येणारे आर्थिक साहाय्य १२ हजार रुपयांवरून १८ हजार रुपये करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

The post अम्मा देणार मोफत मोबाईल आणि १०० युनिट वीज appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

हेमा मालिनींना १० कोटींच्या नुकसान भरपाईची नोटीस

hemamalini

hemamalini
मुजफ्फरनगर- एका ग्राहकाने अभिनेत्री हेमा मालिनींना जाहिरातीत चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हा आरोप उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात रहाणाऱ्या विकास धीमान यांनी केला असून आपल्या आरोपात त्यांनी एका आरओ सिस्टीमच्या जाहिरातीमध्ये हेमा मालिनी भ्रामक माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. यासाठी त्यांनी कंपनी आणि हेमा मालिनींना नोटीस पाठवली आहे.

जाहिरातीमध्ये आर ओ सिसिटीमच्या पाण्याला १०० टक्के शुद्ध संबोधित करण्यात आले आहे. विकास धीमान यांनी त्यांच्या या दाव्याचे खंडन केले आहे. धीमान यांनी आपल्या वकिलामार्फत कंपनीच्या मॅनेजिंग डिरेक्टर, चेअरमन आणि हेमा मालिनी यांना नोटीस पाठवून १५ दिवसांत १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसे न केल्यास फौजदारी कारवाईची इशारा दिला आहे.

धीमानने पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे, टिव्ही चॅनल्स, वृत्त पत्रांमध्ये अभिनेत्री हेमा मालिनी द्वारे केलेल्या जाहिरातीमुळे प्रभावित होऊन त्यांनी १५,५०० रुपयांची आर ओ सिस्टीम खरेदी केली होती. पण त्या आर ओ सिस्टीमचे पाणी प्यायल्यामुळे धीमान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ब्लड प्रेशर, ऍसीडिटी सह अन्य आजारांना सामोरे जावे लागले. धीमान यांचा आरोप आहे की चुकीची जाहिरात करून मशीनला विकण्यात आले आहे म्हणून त्यांनी आपल्या वकीलामार्फत कंपनी आणि हेमा मालिनी यांना कायदेशीर नाटीस पाठवून १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

The post हेमा मालिनींना १० कोटींच्या नुकसान भरपाईची नोटीस appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

अकार्यक्षम अधिकाऱ्यांची होणार हकालपट्टी

modi

modi
नवी दिल्ली – केंद्र सरकारने महसूल विभागातील ३३ अकार्यक्षम वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुदतपूर्वीच निवृत्त करण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ७२ अधिकाऱ्यांना गेल्या दोन वर्षांत विभागीय आणि शिस्तभंगाच्या कारवाईनंतर निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान ३३ अधिकाऱ्यांची एकाच वेळी हकालपट्टी करण्याची ही पहिलीच घटना आहे. अकार्यक्षमतेचा नोकरीवर काहीही परिणाम होत नसल्याच्या विचाराला तडा देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध विभागातील अधिकाऱ्यांबाबत देशभरातून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जानेवारीमध्ये मोदींनी सर्व विभागाच्या सचिवांना अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर केंद्राने विविध विभागातील आणि मंत्रालयातील १२२ उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची यादी तयार केली.

The post अकार्यक्षम अधिकाऱ्यांची होणार हकालपट्टी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

गरम पाण्याची विहीर राजस्थानात सापडली

hot-water

hot-water
उदयपूर- मृद शास्त्रज्ञांना राजस्थानातील पाली आणि बेवार जिल्ह्यांना जोडणा-या राज्यमहामार्गावरील बिचर्डी गावात गरम पाण्याची विहीर सापडली आहे.

या विहिरीतील पाण्याचे तापमान थंडीच्या दिवसातही ५८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे. ही विहीर एका खासगी जागेत असून जागा मालकाला मात्र तिचे महत्त्व ओळखता आलेले नाही. त्याच्या मते, गरम पाण्याची विहीर म्हणजे आपल्या घराण्याला मिळालेला शाप आहे, अशी त्याची समजूत आहे. अशी विहीर अत्यंत दुर्मिळ असून तांत्रिक भाषेत अशा विहिरींना जिओथर्मल वेल्स या नावाने ओळखले जाते. भुराराम नावाच्या एका गरीब शेतक-याची ही विहीर आहे. या विहीरीचे नाव नोखरा बेरा असे आहे.

भूजल विभाग आणि राष्ट्रीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या अधिका-यांनाही येथे अशा स्वरुपाची विहीर असल्याची कल्पना नव्हती. यामुळे ही विहीर राजस्थानमधील अशा स्वरुपाची पहिलीच विहीर असल्याची शक्यता आहे, असे भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या पुष्पेंद्र सिंह राणावत यांनी सांगितले. शेतीला पुरवठा करण्यासाठी या विहिरीचे पाणी रोज थंड करावे लागते, याबद्दल मात्र भुरारामने नाराजी व्यक्त केली.

The post गरम पाण्याची विहीर राजस्थानात सापडली appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

‘बद्रिनाथ की दुल्हनिया’चा फर्स्ट लूक रिलीज

badrinath-ki-dulhniya

badrinath-ki-dulhniya
पुन्हा एकदा अभिनेता वरुण धवन आणि आलिया यांची जोडीपाहायला मिळणार असून हे दोघे पुन्हा एकदा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच धर्मा प्रोडक्शनने चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. ‘हम्पी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे.

या चित्रपटातदेखील ‘हम्पी शर्मा की दुल्हनिया’ प्रमाणे लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे हे फर्स्ट लूकवरुन स्पष्ट होत आहे. आलिया एकदन देसी अवतारमध्ये दिसत असून वरुण थोडा रावडी लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक खेतान यांच्यावर आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात येणार आहे. उत्तर भारतात या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडणार असून पुढील वर्षी १७ मार्चला चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

The post ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’चा फर्स्ट लूक रिलीज appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

अवयव प्रत्यारोपणासाठी आता ‘ड्रोन’चा वापर

चेतन कुमार । बेंगळुरु

अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवेळी रुग्णालयात वेळेत अवयव पोहोचणे आवश्यक असते. अवयव जितक्या दूर अंतरावरून आणायचा असेल तितकी जोखीम अधिक असते. हृदय, किडणी यांसारख्या अवयवांचे वहन जलद वेगाने व्हावे यासाठी ड्रोनचा वापर कशा पद्धतीने करता येईल हे शोधण्यासाठी बेंगळुरू येथे शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. जर प्रयोग यशस्वी झाला तर ड्रोनचा वापर अवयव वाहून नेण्यासाठी करणारे बेंगळुरू हे देशातील पहिले शहर बनेल.

अनमॅन्ड एरिअल वेइकल(UAVs) म्हणजेच ड्रोनच्या मदतीने अवयवांचे वहन केल्यास रुग्णाला वेळेत मदत मिळू शकते. अन्य अवयवांपेक्षा हृदय लवकर निकामी होतं. त्यामुळे आमचं मुख्य लक्ष्य हे हृदय प्रत्यारोपण आहे, असे फायटर लाइट कॉम्बेट एअरक्राफ्टचे(LCA) जनक कोटा हरिनारायण यांनी सांगितले. ड्रोनच्या मदतीने अवयव वहनाचे काम सुरू झाले, तर अवयव प्रत्यारोपणासाठी होणारा खर्च ५० टक्क्यांहून कमी होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

अवयवदात्याच्या शरीरातून बाहेर काढल्यानंतर किडणी २४ तास, तर यकृत १२-१५ तास सुरक्षित राहते. मात्र हृदय केवळ १० तास सुरक्षित राहते. सध्या ग्रीन कॉरिडोअर तयार करून अवयव रुग्णालयापर्यंत पोहोचवले जातात.

नॅशनल डिझाइन अँड रीसर्च फोरम(NDRF) मधील वैज्ञानिक के रामाचंद्रा आणि अमेरिकेत राहणारे काही अन्य वैज्ञानिक नॅशनल प्रोग्राम फॉर माइक्रो एअर वेइकल्सवर(NP-Micav) काम करत आहेत. डॉक्टर आणि इंजिनिअरकडून तपशील मिळाल्यानंतर प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. तसेच आम्ही उद्दिष्टाच्या जवळ पोहोचू, असे कोटा यांनी सांगितले.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनिया-राहुलसह काँग्रेसचे दिग्गज नेते ताब्यात

मटा ऑनलाइन वृत्त । दिल्ली

ऑगस्टा वेस्टलॅंड डीलमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा हात होता भाजपच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आज जंतर-मंतर ते संसद असा मोर्चा काढला. मोर्चात सहभागी झालेल्या काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, ए. के. अॅन्टॉनी, मनमोहन सिंह, गुलाम नबी आझादसह असंख्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

गुलाम नबी आझाद, अजय माकन, पीसी चाको आणि सचिन पायलटसह पक्षाचे सर्वच दिग्गज नेते काँग्रेसच्या मोर्चात उपस्थित होते. आंदोलनाला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, लोकशाही संपवण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे हे मनसुबे कदापि पूर्ण होऊ देणार नाही असा घणाघात सोनिया यांनी केला. ‘आज आम्ही एक संदेश देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. हा संदेश केवळ रायसीनामध्ये बसलेल्या व्यक्तीसोबतच नागपुरात बसलेल्या लोकांनीही ऐकावा’, ‘आम्हाला बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत’, नागपुरात बसलेल्या लोकांच्या इशाऱ्यावर केंद्रातील मोदी सरकार चालवत असल्याचा आरोपही सोनिया यांनी केला.

दोन वर्षात मोदी सर्व संपवू पाहत आहेत

गेल्या ६०-७० वर्षात लोकशाही मजबूत करण्याच्या संस्था काँग्रेसने निर्माण केल्या. शेतकऱ्यांना मजबूत बनवले. परंतु केंद्रातील सत्तेत आल्यानंतर दोन वर्षात मोदी सरकार सर्व संपवू पाहत आहे. भाजप शासन काळात शेतकरी, जवान, व्यापारी सर्व देशोधडीला लागत आहेत.

सत्तेसाठी मोदींची भूक वाढली

खोटे आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदींची सत्तेची भूक वाढली आहे. पैशांच्या आणि सत्तेच्या बळावर मोदी देशातील राज्यातील काँग्रेस सरकार पाडत आहेत. लोकशाहीची हत्या केली जात आहे.

महिला, दलित, मागासवर्गीयविरोधात मोदी सरकार

काँग्रेसने पंचायती राज असा कायदा करुन लोकशाहीला अधिक मजबूत केले होते. परंतु यात मोदी सरकार बदल करुन महिला, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव आखत आहेत, असा आरोप सोनिया गांधींनी केला.

मोदी सरकार आल्यापासून देशातील समाजाची खान-पानावरुन विभागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. कोणालाही देशद्रोही ठरवू जाऊ लागले आहे, असा आरोप सोनियांनी केला. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधींची भाषणे झालीत.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट