टॉम क्रूजच्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी पोहचली दीपिका!

deepika-padukone

deepika-padukone
दीपिका सध्या आपला हॉलिवूडपट ‘एक्सएक्सएक्स : द जेंडर केज’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून ती हॉलिवूडमध्ये एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे.

दीपिकाची हॉलिवूडमध्ये आणखीन संधी पटकावण्याची इच्छा असल्यामुळेच ती टॉम क्रूजचा आगामी सिनेमा ‘द ममी’साठी ऑडिशन देण्यासाठी दाखल झालेली दिसली.

याबाबत एका मनोरंजन वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ‘द ममी’च्या मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी दीपिकाने ऑडिशन दिले. परंतु, अद्याप या चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने दीपिकाच्या निवडीबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी या भूमिकेसाठी हुमा कुरेशी हिनेदेखील ऑडिशन दिले आहे. परंतु, ही भूमिका ब्रिटिश अभिनेत्री अन्नाबेले वालिस हिला मिळाल्याची कुजबूज सुरू आहे. ही एका आर्केलॉजिस्टची भूमिका आहे.

The post टॉम क्रूजच्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी पोहचली दीपिका! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

पठाणकोटला जोडून असलेली पाकची सीमा सील

pathankot

pathankot
पठाणकोट : पंजाब पोलिसांनी आधी दीनानगर पोलीस स्थानक आणि नंतर पठाणकोट हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर महत्वाचे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानला जोडून असलेल्या पठाणकोट आणि गुरदासपूर जिह्यांची सीमा पूर्णपणे सील करण्यात आली आहे. दीनानगर हल्ल्यानंतर सीमेवर एक डीएसपी स्तरीय अधिका-याची कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु त्याची बदली होताच हे पद समाप्त करण्यात आले होते. परंतु हवाईतळावरील हल्ल्यानंतर पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. आता एसपी स्तराचा अधिकारी आता तेथे तैनात करण्यात आला आहे.

पठाणकोटमध्ये घुसखोरी रोखणे आणि पठाणकोटच्या आत दहशतवाद्यांना संरक्षण देणा-या स्लीपर सेलची ओळख पटविण्याची जबाबदारी या अधिका-याची असेल. पोलिसांनी यादृष्टीने आता लष्कराच्या बंकर्सची तपासणी केली तर भूयाराच्या शक्यतेमुळे सीमेचा कानाकोपरा धुंडाळण्यात आला. बदलत्या समीकरणांतर्गत आता सीमा क्षेत्रात ३ स्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली.

पहिल्या स्तरात बीएसएफ पाक सीमेवर थेटपणे स्वतः नजर ठेवून आले. दुस-या स्तरावर बीएसएफ विशेष चौक्या उभारण्याचे काम करत आहे.तिस-या स्तरांतर्गत बीएसएफ, लष्कर आणि पोलिसांच्या मदतीने अशा सर्व चौकांवर कक्ष निर्माण करण्यात आले आहे, जेथून लोक गुरदासपूर किंवा जम्मू-काश्मीरमधून पठाणकोटमध्ये प्रवेश करतात. याशिवाय पंजाब पोलिसांनी आपल्या पातळीवर स्तर-ते-स्तर सुरक्षा कवच प्रदान केले आहे. तर पठाणकोट तसेच गुरदासपूर जिह्यात पोलिसांनी ७५० सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्याद्वारे कोणत्याही घुसखोरीवर नजर ठेवता येईल.

The post पठाणकोटला जोडून असलेली पाकची सीमा सील appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

मुस्लिम महापौर निवडणार लंडन ?

mayor

mayor
लंडन : पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्तीची लंडनच्या महापौरपदी निवड होऊ शकते. लंडनच्या महापौरपदाची निवडणूक पाकिस्तानी वंशाचे सादीक खान लेबर पक्षाच्या तिकीटावर लढवीत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी कंझव्र्हेटीव्ह पक्षाचे उमेदवार झॅक गोल्डस्मिथ हिंदू आणि शिख मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करीत आहेत.

इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये महापौर, विधि-मंडळ आणि सांसदीय निवडणुकांसाठी मतदान होत आहे. लंडनच्या महापौरपदाची लढाई सर्वांधिक प्रतिष्ठेची आहे. माजी मानवधिकार कार्यकर्ते आणि २००५ पासून लेबर पक्षाचे खासदार असणारे सादीक खान (४५) या निवडणुकीत बाजी मारतील, असा सर्वांचा अंदाज आहे. सादीक खान यांचे वडील बसचालक होते. खान यांनी ही निवडणूक जिंकली तर यूरोपातील सर्वांत प्रभावशाली मुस्लिम नेतृत्व म्हणून त्यांचा उदय होणार आहे.

माजी पंतप्रधान गॉरडॉन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते. कॅबिनेट बैठकीला उपस्थित रहाणारे ते पहिले मुस्लिम मंत्री होते. सॉलिसिटर सादिया अहमद बरोबर त्यांचा विवाह झाला. खान यांना दोन मुली आहेत. मी यूरोपीयन, ब्रिटिश, इंग्लिशन लंडनर आहे, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. १९४७ फाळणी झाल्यानंतर सादीक खान यांचे आजी-आजोबा भारतातून पाकिस्तानात गेले. सादीक खान यांचा जन्म होण्याआधी त्यांचे माता-पिता इंग्लंडमध्ये स्थायिक झाले.

The post मुस्लिम महापौर निवडणार लंडन ? appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

राज्य टंचाईमुक्त होईपर्यंत काम करणार पाणी फाऊंडेशन – आमिर खान

aamir-khan

aamir-khan
अमरावती: पाण्याची राज्यात समस्या फार गंभीर असून या प्रश्नावर लोकसहभागातून मात करता येऊ शकते. म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील वरूड, कोरेगाव (सातारा), अंबेजोगाई (बीड) या तीन तालुक्यांतील गावांमध्ये स्पर्धा सुरू केली असून स्पर्धेत सहभागी गावांसाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने एक कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्य टंचाईमुक्त होईपर्यंत पाणीप्रश्नावर सतत काम करीत राहीन, अशी भावना पाणी फाऊंडेशनचा संस्थापक आमिर खान याने अमरावती व्यक्त केली.

आमिर खान काल सकाळी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर, रिमा लागू, अभिनेते सुनील बर्वे यांच्यासह वरूड तालुक्याती वाठोडा येथे आला होता. आमिर खान येणार म्हणून राजकीय मंडळींनी सुद्धा येथे चांगली गर्दी केली होती. यावेळी काटोलचे आमदार आशिष देशमुख, आमदार अनिल बोंडे, पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, वसुधा बोंडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

याआधीही श्रमदानाविषयी आमिर खान याने बोलून दाखवले होते. त्यानुसार काल येथे येऊन त्याने लोकांसोबत श्रमदान केले. आमिर खान याने वाठोडा गावच्या पाझर तलावात श्रमदान करून तलावातील गाळ काढला. आमिर खान पुढे म्हणाला की, यावर्षी ३ तालुक्यांत तर पुढील वर्षी ३० तालुक्यांत आणि त्यापुढील वर्षी ३०० तालुक्यांत ही स्पर्धा घेण्यात येईल. राज्य पूर्णपणे टंचाईमुक्त होईपर्यंत आम्ही ही स्पर्धा घेतच राहू. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावात जलसंवर्धनाचे उपक्रम राबविले जाणार असल्याने प्रत्येकच गाव विजेता ठरेल.

सत्यजित भटकळ यांनी ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी वाठोडा ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले व स्पर्धेची माहिती दिली. शास्त्रीयदृष्ट्या पाणी अडविणे, जिरविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक गावातील ५ लोकांना प्रशिक्षण दिले आहे. वरूड तालुक्यात या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनातील अधिकारी नियमितपणे श्रमदान करतात. ही चळवळ निश्चिपणे पाणीप्रश्न संपवेल. यावेळी अभिनेत्री रिमा लागू, सई ताम्हणकर, सुनील बर्वे, आ. अनिल बोंडे यांची देखील भाषणे झालीत. जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले, वाठोडा तालुक्यात ५६ हजार एकर जमीन मशागतीखाली आहे. त्यातील १० हजार एकर जमीन सिंचनाखाली आहे. पुढील तीन वर्षांत या भागात ठिबक करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.

The post राज्य टंचाईमुक्त होईपर्यंत काम करणार पाणी फाऊंडेशन – आमिर खान appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

यंत्रमानवांमुळे कोसळणार बेरोजगारीची कुऱ्हाड

robot

robot
लॉस एंजिलिस : सध्या प्रत्येकाच्याच दैनंदिन आयुष्यात स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे परंतु येत्या काही वर्षांत स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे तयार झालेले यंत्रमानव जिवंत मनुष्याची जागा घेतील, असे भाकीत केले जात आहे. तंत्रज्ञानाच्या बाजारपेठा आणि विशेषतः नोक-यांवर होणारा प्रभाव याविषयी कॅलिफोर्नियातील मिल्केन इन्स्टिट्यूटसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत चर्चा झाली आहे. परिषदेत सुमारे ३,५०० लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ७०० जणांनी तंत्रज्ञानामुळे कमी वेतन असलेले आणि साध्या कौशल्यांवर आधारलेले रोजगार बंद झाल्याचे मान्य केले.

स्वयंचलित तंत्रज्ञानाचा फायदा प्रामुख्याने कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि चुकांचे प्रमाण कमी होण्यासाठी होतो. परंतु ब-याच वेळा यामुळे मनुष्यबळातदेखील घट होते, असे मत मँकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटचे मायकल चुई यांनी व्यक्त केले आहे. स्वयंचलित तंत्रज्ञानाचा आर्थिक क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांना सर्वांत मोठा धोका आहे. येत्या १० वर्षांमध्ये अमेरिका आणि यूरोपमधील बँकिंग क्षेत्रातील ३० टक्के नोक-यांमध्ये कपात होण्याचे भाकीत सिटी ग्रुपच्या अहवालात करण्यात आले आहे. जगभरातील अनेक बँकांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठराविक व्यवसायांमधील नफा कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर कर्मचा-यांच्या संख्येत कपात केली आहे.

नफा वाढविण्याच्या दबावाखाली कित्येक बँकांनी आपला खर्च कमी करण्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. केवळ एका उपकरणावरीलमाहिती दुस-या उपकरणावर साठविण्याचे काम आता स्वयंचलित होणार आहे. गोल्डमन सॅक्स, जेपी मॉर्गनसारख्या बँकादेखील येत्या १० वर्षांत या तंत्राचा अवलंब करतील. त्यांच्या कामाचा दर्जा आणि कर्मचा-यांची संख्या यात लक्षणीय फरक दिसून येईल, असे प्रतिपादन सव्र्हिस अ‍ॅनालिटिक्स कंपनी केंशोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल नॅडलर यांनी व्यक्त केले.

The post यंत्रमानवांमुळे कोसळणार बेरोजगारीची कुऱ्हाड appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना आर्चीला भासली एक उणीव

rinku-rajguru

rinku-rajguru
नुकताच रिंकू राजगुरूला ‘सैराट’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. तिचे सोशल मिडियातून भरभरून कौतुकही करण्यात आले. पण जेव्हा रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला तेव्हा तिला एक उणीव भासत होती. ती म्हणजे नागराज मंजुळे यांची.

रिंकूने पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. रिंकूचे या चित्रपटासाठी ऑडिशनच्या माध्यमातून सिलेक्शन करण्यात आले हे तर सर्वांनाच माहिती आहे. तिच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. नुकताच तिला पुरस्कार दिला गेला. तिच्यासोबत तिचे आई वडीलही होते. पण एक व्यक्ती नव्हती ती म्हणजे या चित्रपटात तिच्याकडून सर्व काम करून घेणारा प्रतिभावंत दिग्दर्शक नागराज मंजुळे. रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल हे मला माहित असल्याचे नागराजने अनेक मुलाखतींमधून आधीच सांगितले होते.

रिंकूला ज्या दिवशी पुरस्कार मिळाला त्या दिवशी तिला प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा तिने सांगितले की, या सगळ्या प्रवासात माझ्या सोबत खंबीरपणे राहिलेला नागराज दादा काल सोबत नव्हता याचे मला फार दुःख झाले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रिंकूचे वडील महादेव राजगुरु आणि आई आशा राजगुरु देखील दिल्लीला तिच्यासोबत गेले होते. राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर रिंकू जेव्हा तिच्या आई-वडिलांकडे गेली तर त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

दरम्यान, पहिल्या आठवड्यात म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल १२.२० कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या आठवड्याला इतकी कमाई करणारा हा मराठीतील पहिला चित्रपट ठरला आहे. यानंतर सोमवारी या चित्रपटाने २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यापूर्वी ‘नटसम्राट’ चित्रपटाने एका आठवड्यात १६ कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा ‘नटसम्राट’ २२ कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा ३५ कोटींच्या घरात गेला होता.

The post राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना आर्चीला भासली एक उणीव appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.