‘झिंगाट’च्या तालावर थिरकले परदेशी लोक!

sairat1

sairat1
केवळ आणि केवळ ‘सैराट’ या चित्रपटाची सध्या सर्व महाराष्ट्रात चर्चा आहे. या चित्रपटाच्या गाण्यांनी सर्वांना याडं लावले आहे. लोक अगदी चित्रपट पाहात असतानाही चित्रपटगृहात गाणी लागण्यावर नृत्य करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण आता केवळ मराठी माणूसच नाही तर रशियन लोकही या चित्रपटातील गाण्यावर थिरकायला लागली आहेत.

आपल्या संगीताने रशियन लोकांनाही अजय-अतुल या संगीतकार जोडीने याडं लावलं आहे. रशियन लोक झिंगाट गाण्यावर नृत्य करत असल्याचा व्हिडिओ अजय-अतुलने त्यांच्या ट्विटरवर ट्विट केला आहे. या लोकांना गाण्याचे शब्द कळत नसले तरी त्याचे संगीत मात्र त्यांना त्याच्यावर थिरकण्यापासून रोखू शकले नाही. तर चला पाहूया रशियन लोकांचा सैराट डान्स.

The post ‘झिंगाट’च्या तालावर थिरकले परदेशी लोक! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

‘प्रभुं’नी सोडविली रेल्वे चालकांची सर्वात मोठी समस्या !

biotoilet

biotoilet
नवी दिल्ली – मागील १६३ वर्षांपासून ज्या सुविधेची प्रतीक्षा रेल्वे चालकांना होती, ती आता संपणार आहे. याता त्यांना शौच करण्यासाठी पुढचे स्टेशन येण्याची वाट पहावी लागणार नाही. रेल्वे प्रशासनाने शौचालयाची सुविधा असणारे पहिले इंजिन तयार केले आहे आणि भविष्यात अशी सुविधा असणारी इंजिनेच तयार केली जाणर असल्याचे सांगितले. जुन्या इंजिनामध्येही शौचालय बसवली जाणार आहेत. आज (शुक्रवार) रेल्वेमंत्री सुरेश प्रभु याचा शुभारंभ करणार आहेत. प्रथम ही सुविधा मालगाडी इंजिनला पुरवली जाईल.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे इंजिने डब्लूडीजी-४डी-७०४८६ डूएल कॅब ४५०० अश्वशक्तिची एकूण ५७१४ डिझेल इंजिनांमध्ये इंटरलॉकिंग बॉयोटॉयलेट बसविण्यात येणार आहेत. जेव्हा रेल्वेची गती शुन्य असेल म्हणजे गाडी पूर्णपणे थांबल्यानंतरच शौचालयाचा दरवाजा उघडला जाईल. चालत्या गाडीमध्ये लोको पायलट याचा वापर करू शकणार नाहीत. या टॉयलेटमध्ये अनेक प्रकारचे सेंसर लावले आहेत. लोको पायलट जर शौचालयात असेल आणि गेट बंद असेल तर लोको इंजिनचा ब्रेक कोणत्याही परिस्थितीत काढला जाऊ शकत नाही. शौचालयाचा दरवाजा बंद असतानाही ट्रेन सुरू करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तरी हे शक्य नाही.

शौचालयाच्या दरवाजाच्या वरच्या बाजुला लाल आणि हिरव्या रंगाचे लाईट लावले आहेत. ट्रेन स्टेशनवर थांबल्यास ग्रीन लाईट जळेल आणि शौचालयाचा दरवाजाही उघडला जाईल. ट्रेन सुरू झाल्यावर लाल बत्ती जळेल. त्यावेळी शौचालयाचा दरवाजा कोणत्याही परिस्थितीत उघडणार नाही. रेल्वे अधिकारी सांगताता की, अशी सिस्टिम सुरक्षेच्या कारणामुळे केली आहे. ज्यामुळे ट्रेनच्या वाहतुकीत बाधा येणार नाही. इंजिनमध्ये दोन चालक असतात. जर चालत्या ट्रेनमध्ये एक शौचालयात गेला तर दुसऱ्याचे लक्ष विचलित होऊ शकते व मोठा अपघात होण्याची संभावना असते. त्यामुळे इंटरलॉक दरवाजा लावण्यात आला आहे. शौचालयाची सुविधा असणारे रेल्वेकडे उपलब्ध असणारे हे एकमेव इंजिन आहे. रेल्वेकडे एकूण १०,७७३ इंजिने आहेत. त्यापैकी ५७१४ डिझेल इंजन आहेत.

अनेक वर्षांपासून रेल्वे चालकांची मागणी होती की, रेल्वेच्या इंजिनमध्येच शौचालयाची व्यवस्था करावी. ही सुविधा नसल्याने अनेक रेल्वे गाड्या तास-तास उशिराने धावत होत्या. मालगाडी सुद्धा अनेक वेळेला प्लॅटफॉर्मवरच थांबून रहात असे. दरम्यान पहिल्यांदा अशा प्रकारचे इंजिन मालगाड़ीसाठी वापरण्यात येईल.

The post ‘प्रभुं’नी सोडविली रेल्वे चालकांची सर्वात मोठी समस्या ! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

कोट्यावधीचा चुना लावणारा ‘केबीसी’चा मालकाला अटकेत

kbc

kbc
नाशिक- अल्पावधीत तिप्पट परताव्याचे दीड वर्षांपूर्वी केबीसी कंपनीने आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आजपर्यंत सुमारे २७०० गुंतवणूकदारांनी आडगाव पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी काही एजंटना ताब्यात घेतले होते, मात्र मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आपल्या पत्नीसह देश सोडून पळून गेला होता. त्यांना आज सकाळी मुंबईच्या विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात जवळपास एकट्या नाशिकमध्ये २१० कोटी रुपयांची फसवणूक झल्याचे समोर आले होते. काही वेळापूर्वी भाऊसाहेब चव्हाणला पत्नीसह नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत नागरीकांना जवळपास ३५० कोटींना फसवण्यात आले आहे.

The post कोट्यावधीचा चुना लावणारा ‘केबीसी’चा मालकाला अटकेत appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

‘केबीसी’ घोटाळा: भाऊसाहेब चव्हाण अटकेत

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

राज्यभरातील गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या ‘केबीसी’ घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांना आज सकाळी मुंबई विमानतळावर पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वीच या घोटाळ्याचा तपास नाशिक पोलिसांनीच करावा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर आज चव्हाण यांना झालेली अटक हे नाशिक पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण, त्याच्या पत्नीसह सिंगापूरहून भारतात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांसह सीबीआय, विमानतळावरील अधिकारी आणि कर्मचारी आज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लक्ष ठेऊन होते. त्यानंतर भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले.

केबीसी घोटाळाप्रकरणी आपल्याला अटक होणार अशी माहिती भाऊसाहेब चव्हाणला होती, असे पोलीस आयुक्त्यांनी सांगितले.

नाशिक हे केंद्र असलेल्या केबीसी घोटाळ्याची पोलखोल जुलै २०१४ मध्ये झाली. नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासादरम्यान घोटाळ्याची व्याप्ती वाढतच गेली. नाशिकमध्ये सात हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदार असून येथील घोटाळ्याची व्याप्ती २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी १५ संशयित आरोपींपैकी १४ जणांना अटक केली होती. यातील, घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण काही दिवसांनी जामिनावर सुटला. मात्र, यानंतर त्याने थेट सिंगापूर गाठले.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुब्रतो रॉय यांच्या आईचे निधन

subrato-rai

subrato-rai
लखनौ – आज सकाळी वृद्धापकाळाने सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांची आई छबी रॉय यांचे निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. सहारा ग्रुपच्या प्रवक्‍त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज पहाटे १.३४ वाजता छबी रॉय यांचे निधन झाले. सहारा ग्रुपला त्यांचे मोठे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांचा जन्म बिहार मधील अरारिया जिल्ह्यात झाला आहे. दरम्यान, सहारामधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुब्रतो रॉय हे २०१३ पासून तिहार कारागृहात आहेत.

The post सुब्रतो रॉय यांच्या आईचे निधन appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

डॉन दाऊदचा मोदींना कमजोर करण्यासाठी मास्टर प्लॅन

dawood

dawood
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी तसेच कमजोर करण्यासाठी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांनी एक मास्टर प्लॅन आखला होता. त्यानुसार धार्मिक तेढ करण्यासाठी चर्चवर हल्ले करण्याचा कट होता. मात्र, हा कट यशस्वी झाला नाही.

भारतात सामाजिक अस्थिरता निर्माण व्हावी, जातीय तणाव वाढावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते तसेच चर्च यांच्यावर हल्ले करण्याचा कट दाऊद इब्राहिमच्या ‘डी कंपनी’ने आखला होता, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. डी कंपनीने यासाठी आपल्या दहा लोकांवर ही जबाबदारी सोपवली होती. धार्मिक नेत्यांसोबतच संघाचे नेते आणि चर्चेवर हल्ले करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. एनआयए या दहा जणांविरोधात चार्जशीट दाखल करणार आहे. विशेष म्हणजे २०१४मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हा कट रचण्यात आला आहे.

डी कंपनीचे सदस्य पाकिस्तानमधील जावेद चिकना आणि दक्षिण अफ्रिकेतील झाहीद मियान तथा जाओ या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचे समोर आल्याचे एनआयएने केलेल्या तपासाच पुढे आले. इतकच नाही तर त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात जातीय तणाव वाढावा यासाठी संघाचे नेते आणि चर्चवर हल्ले करण्याची योजना आखली होती. जावेद चिकनाला पकडण्यासाठी एनआयएने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्याला अटक करुन भारताच्या हवाली करण्याची विनंती केली आहे. तसेच पाकिस्तान, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, सौदी अरेबिया, अमेरिका आणि दुबई या देशांना न्यायालयीन विनंती तसंच म्युच्युअल कायदेशीर सहाय्य मान्यता करार विनंती पाठवली आहे.

The post डॉन दाऊदचा मोदींना कमजोर करण्यासाठी मास्टर प्लॅन appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

मोदींच्या विदेश दौ-यावर ११७ कोटी खर्च

modi1

modi1
नवी दिल्ली- २०१५-१६मध्ये एअर इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौ-यावर ११७ कोटी रुपये खर्च केले आहेत. हा खर्च २०१४-१५ पेक्षा २५ टक्‍क्‍यांनी जास्त झाला असल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

पंतप्रधानांच्या विदेश दौ-यावर झालेल्या खर्चाबाबतची माहिती सेवानिवृत्त अधिकारी लोश बत्रा यांनी माहिती अधिकारातून विचारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ ते डिसेंबर २०१६ पर्यंत २२ देशांचे दौरे केले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या विदेश दौ-यावर २०१३-१४ मध्ये १०८ कोटी रुपये खर्च झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१५मध्ये फ्रान्स, कॅनडा व जर्मनी या देशांचा केलेला दौरा सर्वाधिक महागडा ठरला आहे. या दौऱ्यांवर ३१ कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती बत्रा यांना देण्यात आली आहे.

The post मोदींच्या विदेश दौ-यावर ११७ कोटी खर्च appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.