उ. कोरियाचे क्षेपणास्त्रांची चाचणीचे प्रयत्न फसले

north-korea

north-korea
सोल : दोन क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाने सोडली असून ती मध्यम पल्ल्याची होती. ती बहुदा मुसुदान ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असावीत, असे अमेरिका व दक्षिण कोरियाच्या अधिका-यांनी सांगितले. या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्याचे अनेक प्रयत्न एप्रिलपासून झाले. बुधवारी पाचवा व सहावा प्रयत्न करण्यात आला. यातील पाच प्रयत्न फसले असून अनेकदा ही क्षेपणास्त्रे आकाशात उडाल्यानंतर फुटली. सहाव्या प्रयत्नात हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटर गेले. दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की, क्षेपणास्त्रात प्रगती दिसत असली तरी ते ३५०० कि. मी. चा टप्पा गाठू शकणार नाही. त्यामुळे ते मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.

अनेकदा अपयश येऊनही उत्तर कोरियाने निर्धार सोडलेला नसून मुसुदान क्षेपणास्त्रे ही अमेरिका व मित्र देशांना डोकेदुखी ठरली आहे. कारण या क्षेपणास्त्रामुळे आशिया, पॅसिफिक व अमेरिकेचा ग्वाम लष्करी तळ अशी अनेक ठिकाणे उत्तर कोरियाच्या टप्प्यात येतात. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या सांगण्यावरून उत्तर कोरियाच्या वैज्ञानिकांनी ही क्षेपणास्त्रे तयार केली आहेत. याच वर्षी उत्तर कोरियाने चौथी अणुचाचणी केली असून एका लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची चाचणीही केली आहे.

दक्षिण कोरियाने म्हटले आहे की बुधवारी पहिले क्षेपणास्त्र पूर्वेकडील वूनसान येथे कोसळले. जपानने म्हटले आहे की, क्षेपणास्त्राचे तुकडे झाले असून ते पूर्व किनारी द्वीपकल्पात कोसळले. दुसरे क्षेपणास्त्र ४०० किलो- मीटर अंतरावर गेले व ते मुसुदान असावे ते यशस्वी झाले की अपयशी ठरले हे समजू शकले नाही पण मागील चाचण्यांपेक्षा कमी अंतर त्याने कापले असे सांगण्यात आले. अमेरिकेच्या हवाई नियंत्रण केंद्राने सांगितले की, उत्तर कोरियाची दोन संशयित क्षेपणास्त्रे जपानच्या सागरात पडली. त्यामुळे उत्तर अमेरिकेला काही धोका नव्हता.संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार उत्तर कोरियाला आंतरखंडीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मुसुदान हे क्षेपणास्त्र ऑक्टोबर २०१० मध्ये प्याँगयाँग येथे प्रदर्शित करण्यात आले होते पण त्याच्या चाचण्या यशस्वी झालेल्या नाहीत.

The post उ. कोरियाचे क्षेपणास्त्रांची चाचणीचे प्रयत्न फसले appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

संघाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेचे प्रश्नचिन्ह

rss

rss
मुंबई – राजधानी दिल्लीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले असून यावरून संघाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह शिवसेनेने उपस्थित केले आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील निवडणुकाजवळ आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघाने आपल्या भूमिकेला मुरड घातल्याचीही टीका सेनेने यावेळी केली आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या की, संघाला भारत देश हिंदूचा करायचा आहे. तसेच भाजपही स्वतःला हिंदूचा पक्ष म्हणवून घेते. मग ही इफ्तार पार्टी आली कोठून? या पार्टीचे आयोजन करण्यामागे काय आहे? यातून त्यांना काय साध्य करायचे आहे, असे प्रश्न कायंदे यांनी उपस्थित केले आहे. लोकसभा जिंकल्यानंतर भाजपने राम मंदिराचा मुद्दा मागे टाकला. एवढेच नाहीतर राम मंदिराचा मुद्दा हा राजकिय नसून सांस्कृतीक असल्याचेही भाजप म्हणत आहे. आता उत्तर प्रदेशातील निवडणुका जवळ येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप हिंदुत्वाचा मुद्दा मागे टाकत असल्याचे दिसत असल्याचेही कायंदे यावेळी म्हणाल्या.

मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि आरएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने या पार्टीचे आयोजन केले आहे. दिल्लीत २ जुलै रोजी होणाऱ्या या पार्टीसाठी देश विदेशातील दूत आणि अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत. त्यात भारत ‘दंगल मुक्त’ आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानचे दूतही उपस्थित राहणार आहेत.

The post संघाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेचे प्रश्नचिन्ह appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर होणार कारवाई

sudhir-munguntiwar

sudhir-munguntiwar
औरंगाबाद – बँकांतर्फे मराठवाड्यात पीककर्जासाठी अडचणी निर्माण केल्या जात असल्याच्या तक्रारी आल्या असून यावर मंत्रिमंडळ बैठकीतही गंभीर चर्चा झाली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचे पालक सचिव येत्या तीन दिवसांत त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पीककर्जाचा आढावा घेतील. कर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

ते वृक्षारोपण मोहिमेचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. ते म्हणाले, की मराठवाड्यासह विदर्भातील उद्योगांना वीजदरात सवलती देण्याचा निर्णय येत्या आठ ते दहा दिवसांत होईल. उत्तर महाराष्ट्राबाबतीतही सरकार विचार करीत आहे. टॅंकरमुक्तीसाठी महाराष्ट्रातही वॉटर ग्रीड योजना राबविणार आहोत. गुजरातमधील योजना आम्ही बघून आलो. मराठवाड्यात भविष्यात वॉटर ग्रीड राबविण्यासाठी अभ्यास केला जात आहे. इतर राज्यांमधील योजनांचाही अभ्यास सुरू असून, येत्या तीन महिन्यांत अहवाल तयार केला जाईल.

नाबार्डतर्फे दोन हजार कोटी रुपये बॅंकांना दिले जाणार आहेत. संबंधित बॅंकांनी ही रक्कम गरजू शेतकऱ्यांनाच पीककर्जासाठी वाटप केली, याची लेखी हमी आम्हाला द्यावी, असे वित्त विभागाचे म्हणणे होते. बॅंकांकडून आम्ही हमी घेत आहोत. त्यासाठी एक स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस तयार केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

The post पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर होणार कारवाई appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

थक्क करणारा ‘बुधिया सिंह – बॉर्न टू रन’चा ट्रेलर

budhia-singh

budhia-singh
बुधियाने ५० डिग्री तापमानात धावत पुरी ते भुवनेश्वर हा ६५ किलोमिटरचा प्रवास केवळ ७ तास २ मिनिटात पूर्ण करुन जगाचे लक्ष वेधले होते. तो लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही आपले स्थान मिळवणारा पहिला बालक असून वयाच्या ५ व्या वर्षी ४८ मॅरेथॉन धावणारा बुधियाचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. येत्या ५ ऑगस्टला अशा या बुधिया सिंहच्या जीवनावर आधारीत ‘बुधिया सिंह – बॉर्न टू रन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात बुधियाच्या कोचची भूमिका मनोज वाजपेयी याने केली आहे. या चित्रपटाचा चित्त थरारक ट्रेलर तुम्ही पाहू शकता.

The post थक्क करणारा ‘बुधिया सिंह – बॉर्न टू रन’चा ट्रेलर appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

उत्तुंग झेप

isro

isro
भारतीय अंतराळ संशोधन संघटन (इस्रो) या संघटनेने काल एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून ते स्थिर केले. एकवेळ अशी होती भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ स्वतःचे प्रक्षेपक यान तयार करू शकत नव्हते. ही वेळ साधारण १९८० च्या दशकातली आहे. त्यावेळी भारताचा आर्यभट्ट हा उपग्रह तयार झाला होता. परंतु हा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी आवश्यक असणारे रॉकेटस् भारताकडे नव्हते. त्यामुळे ते उपग्रह परदेशातल्या प्रक्षेपक केंद्रावरून अवकाशात पाठवले जात असत. पुढे भारताने ही क्षमता हस्तगत केली आणि आपले गेल्या २५ वर्षातले ११३ उपग्रह आपण स्वतःच्या उपग्रह यानाच्या माध्यमातून अवकाशात पाठवले आहेत. त्यातली आठ उड्डाणे अयशस्वी ठरली आहेत. पण बाकीची १०५ उड्डाणे यशस्वी ठरली असून भारताने अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात जगात तिसरा क्रमांक निर्विवादपणे मिळवलेला आहे. स्वतःची उपग्रह प्रक्षेपणाची यंत्रणा नसण्यापासून दुसर्‍यांचे उपग्रह अवकाशात नेऊन सोडण्यापर्यंतची प्रगती भारतीय शास्त्रज्ञांनी केली आहे.

जेव्हा आपण परदेशातल्या प्रक्षेपण केंद्रावरून आपले उपग्रह सोडत होतो तेव्हा प्रक्षेपणाच्या क्षेत्रात आपण मागे होतो आणि आपले उपग्रह इतरांनी नेऊन सोडावेत ही आपली कमतरता आहे असे आपल्याला वाटत होते. आताही जगातले काही विकसनशील देश उपग्रहांची निर्मिती करायला लागले आहेत आणि आपल्या देशातल्या काही यंत्रणांचे नियंत्रण उपग्रहांच्या मार्फत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा लहान देशांकडे स्वतःची प्रक्षेपक वाहने नसल्यामुळे त्यांनाही पूर्वीच्या भारताप्रमाणे दुसर्‍याची मदत घ्यावी लागत आहे. अशा छोट्या देशांना तर भारत मदत करत आहेच पण भारताच्या प्रक्षेपक यानांकडून अमेरिका, जर्मनी, रशिया या प्रगत देशातले उपग्रह भारताच्या अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित केले जात आहे. म्हणजे हे प्रगत देश अंतराळ संशोधनाच्या कामात चक्क भारताची मदत घेत आहेत. आता सध्या तरी उपग्रह प्रक्षेपणाचे जागतिक मार्केट १३ लाख कोटी रुपयांचे आहे. त्यातला फार मोठा हिस्सा भारताला मिळू शकतो. इतपत क्षमता भारतीयांनी मिळवली आहे. परंतु तूर्तास तरी भारताचा या क्षेत्रातला वाटा केवळ ४ टक्के आहे. अमेरिकेने यातील ४१ टक्के बाजारपेठ काबीज केलेली आहे. म्हणजे भारताला आणखी बरीच मोठी मजल मारायची आहे. येत्या ८ वर्षांमध्ये जगभरात ही बाजारपेठ वाढून १५ लाख कोटी रुपयांपर्यंत होणार आहे. त्यातला फार मोठा हिस्सा भारताला मिळण्याची आशा भारताच्या कालच्या प्रक्षेपणाने निर्माण झाली आहे. या आशेला आणखी एक कारण आहे.

भारताचा उपग्रह प्रक्षेपणाचा कार्यक्रम फार स्वस्तात राबवला जातो. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः भारताने आखलेल्या दोन मोहिमा इतक्या कमी पैशात राबवल्या की सारे जग चकित झाले. चांद्रयान ही मंगळ मोहीम या दोन्हींचा भारताने केलेला खर्च अमेरिकेच्या अशाच मोहिमेच्या १ दशांश एवढाच होता. त्यामुळे अमेरिकेचे लोक तर चकित झाले आहेत. आजवर भारताने इतर देशांचे ७० उपग्रह प्रक्षेपित केले आहेत आणि ते कमी खर्चात केल्यामुळे आपणही आपला उपग्रह भारताकडूनच प्रक्षेपित करावा असे बर्‍याच देशांना वाटायला लागले आहे. जगातल्या फार मोठ्या व्यवसायामध्ये भारताचे हे पदार्पण आहे आणि त्यातून भारताला अब्जावधी रुपयांचे परकीय चलन मिळणार आहे. या व्यवसायाचे नीट निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल की त्यासाठी भारताने कसल्याही प्रकारची परकीय गुंतवणूक स्वीकारलेली नाही. स्वतःच्या भांडवलात पण जवळपास ३५ वर्षे मेहनत करून भारतीय शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले मोठे मार्केट काबीज करणारा हा व्यवसाय विकसित केला आहे.

भारतात आज कोणत्याही क्षेत्रात मोठी उलाढाल करायची असेल, रोजगार निर्मिती करायची असेल किंवा नवी गुंतवणूक करायची असेल तर भारताला परदेशापुढे गुंतवणुकीचे पर्याय ठेवावे लागतात. परदेशातल्या गुंतवणूकदारांना अनेक प्रकारच्या सवलती देऊन भारतात निमंत्रित करावे लागते. काही वेळा होणारी गुंतवणूक पैशात कमी असते पण त्यासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य आपल्या देशात उपलब्ध नसते आणि गुंतवणूक देशाला हे कौशल्य प्राप्त झालेले असल्यामुळे आपण त्या गुंतवणुकीच्या बाबतीत परदेशीयांचे लांगुलचालन करत असतो. पण अवकाश संशोधनातल्या या गुंतवणुकीसाठी जसे आपण परकीयांपुढे हात पसरलेले नाहीत तसेच तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुध्दा आपण कोणाकडे याचना केलेली नाही. उलट आपली तांत्रिक प्रगती होऊ नये यासाठी अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी देशांनी भारताची अडवणूक करण्याचा काही वेळा प्रयत्न केला आहे. परंतु अशा अडवणुकीतून निर्माण होणार्‍या समस्यांवर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वतःच मात केली आणि आज अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जगातल्या पहिल्या देशांमध्ये आपला समावेश करून घेतला. भारतीय शास्त्रज्ञांच्या तांत्रिक आणि आर्थिक असे दोन्हीही प्रकारच्या प्रकारच्या पराक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.

The post उत्तुंग झेप appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

ऑन स्क्रीन जोडा शोभेना

saif-ali-khan

saif-ali-khan
‘टशन’, ‘कुर्बान’ यासारख्या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान यांनी एकत्र काम केले आहे. पण दोघांची जोडी पडद्यावर शोभत नसल्याचे मत करिनाने व्यक्त केले आहे. तिच्या ‘उडता पंजाब’ या अलिकडच्या चित्रपटातील भूमिकेची खूप चर्चा आहे. ‘हॅप्पी एंडिंग’ या चित्रपटात २०१४ साली सैफ आणि करिना यांनी शेवटचे एकत्र काम केले होते.

पुन्हा स्क्रिनवर एकत्र कधी दिसणार असे विचारले असता करिना म्हणाली, सध्या तरी असे काही होईल असे संभवत नाही. कदाचित २० वर्षानंतर असे होईल…म्हणजे सध्या तरी आम्हाला अशी ऑफर मिळालेली नाही. कदाचित त्यांना ( निर्मात्यांना ) आम्ही ऑनस्क्रिन एकत्र यावे असे वाटत नसेल. आजपर्यंत एकही निर्माता त्या दोघांनी एकत्र काम करण्यासाठी स्क्रिप्ट घेऊन भेटलेला नाही, असेही करिना म्हणाली. सध्या करिना, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्यासोबत आगामी चित्रपटात काम करणार आहे. सैफ आपल्याला ‘फँटम’ या चित्रपटात २०१५ मध्ये शेवटचा दिसला होता. आगामी ‘रंगून’ चित्रपटात सैफ अली, कंगना रानावत आणि शाहिद कपूरसोबत झळकणार आहे.

The post ऑन स्क्रीन जोडा शोभेना appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

एकाच मंचावर आजी आणि माजी मुख्यमंत्री

combo

combo
कोल्हापूर – येत्या २६ जूनला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे कोल्हापुरात येत असून ते शाहू जयंतीच्या निमित्ताने आयोजित दोन ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.

पवार यांच्या प्रमुख उपस्थित ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंहराव पवार संपादित शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील ग्रंथाच्या हिंदीतील आवृत्तीच्या प्रकाशन सोहळा होणार असून शाहूंचा कृतीशील वारसदार म्हणूनही यंदा पवार यांचा गौरव होणार आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस हे राजर्षी शाहू जीवनचरित्र ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे २६ जूनला सकाळी ११ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव संपादित राजर्षी शाहू जीवनचरित्र ग्रंथाच्या या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळाला भेट देणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यात पवार आणि फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post एकाच मंचावर आजी आणि माजी मुख्यमंत्री appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

लग्नास नकार दिल्यामुळं वारांगनेचा खून

पंचगंगा नदीजवळील पाटील महाराज मठाजवळ बुधवारी झालेल्या खुनाचे गूढ उकलण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. विवाहास नकार दिल्याने चिडलेला प्रियकराने वारांगनेचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

तुरुंगातील कैद्यांसोबत पोलिसांची मटणपार्टी?

पोलिस आणि गुन्हेगार यांच्यातील लागेबांधे नेहमीच समोर येतात. गुन्हेगारांवर कारवाई करणारे पोलिसच त्यांच्या हातात हात घालून मजा मारतानाचे चित्र सर्वसामन्यांच्या मनात संदेह निर्माण करते. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली असून याप्रकरणी मुख्यालयातील कैदी पार्टीच्या तिघांना निलंबीत करण्यात आले आहे. याबरोबर त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे.

शहाणपणा शिकवू नका; शिवसेनेने भाजपला ठणकावले

शिवसेना राष्ट्रहितासाठी भूमिका घेते तेव्हा नाके मुरडणारे ‘स्वपक्षातील कलगीतुऱ्यांवर ‘मौन’ धारण करतात. स्वामी आणि अरुण जेटलीही शिवसेनेचे नाहीत. त्यामुळे ज्या सत्तेत बसता, त्या सत्तेविरोधात का बोलता? असा सवाल करणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपला सुनावले आहे.