महेश मोतेवार यांचा जामीन अर्ज फेटाळला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुंतवणूकदारांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले ‘समृद्ध जीवन फूड इंडिया’ या कंपनीचे मालक महेश किसन मोतेवार (वय ४६ रा. धनकवडी ) यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी शुक्रवारी फेटाळून लावला.

मोतेवार यांना ३१ मार्चला अटक झाली आहे. या गुन्ह्यात मोतेवार यांनी जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. अतिरिक्त सरकारी वकिल सुनील हांडे यांनी जामीनास विरोध केला. ते म्हणाले, ‘आरोपीने गुंतवणुकीच्या बेकायदा योजना तयार केल्याची माहिती आयकर विभागाच्या अहवालात नमूद केली आहे. आरोपीच्या कंपनीचे देशभरात सुमारे १३ लाख ४५ हजार ११९ एवढे गुंतवणूकदार आहे. त्यांना कंपनीकडून सुमारे १३५ कोटी रुपये परतावा देणे बाकी आहे. आरोपीच्या धनकवडी येथील घरात ‘बायोमेट्रिक” पद्धतीचे कपाट असून, ते आरोपीची पत्नी लिना मोतेवार याच उघडू शकतात. या कपाटामध्ये महत्त्वाची कागदपत्रे असू शकतात. गुंतवणूकदारांकडून मिळालेले पैसे आरोपीने वेगवेगळ्या प्रकल्पांत गुंतविले आहेत. स्थावर मिळकती, जंगम मालमत्ता त्यांनी खरेदी केल्याचे तपासात आढळून आले आहे. या कंपनीने कर बुडविला आहे, देशभरात आरोपीविरुद्ध १२ गुन्हे दाखल आहे, सध्या तो ओडिशा येथील गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे, या गुन्ह्याचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही.’ सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने मोतेवार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड: अंबाजोगाईत गारपीट; वीज कोसळून १ ठार

म. टा. प्रतिनिधी, बीड

अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांना शुक्रवारी अचानक आलेल्या वादळी वारा आणि गारपिटीने चांगलेच झोडपले. वीज कोसळून दौंडवाडी येथील अशोक नरहरी दौंड (वय ५३) यांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी भाजीपाला उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

दरम्यान, अचानक आलेल्या या आपत्तीने दुष्काळात सापडलेले शेतकरी आणखी हतबल झाले आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकाराची तातडीने दखल घेऊन नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

लातूरमध्ये पाऊस

लातूर : जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, निलंगा तालुक्यांत शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत केलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. चाकूर आणि लातूररोड परिसरात गारा पडल्या. या पावसामुळे या परिसरातील केशर आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

कळवणमध्येही गारपीट

कळवण : कळवण शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी गारांसह तासभर संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कळवण शहरातील रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. कांदा, डाळिंब, तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड: अंबाजोगाईत गारपीट; वीज कोसळून १ ठार

म. टा. प्रतिनिधी, बीड

अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांना शुक्रवारी अचानक आलेल्या वादळी वारा आणि गारपिटीने चांगलेच झोडपले. वीज कोसळून दौंडवाडी येथील अशोक नरहरी दौंड (वय ५३) यांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी भाजीपाला उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

दरम्यान, अचानक आलेल्या या आपत्तीने दुष्काळात सापडलेले शेतकरी आणखी हतबल झाले आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकाराची तातडीने दखल घेऊन नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

लातूरमध्ये पाऊस

लातूर : जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, निलंगा तालुक्यांत शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत केलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. चाकूर आणि लातूररोड परिसरात गारा पडल्या. या पावसामुळे या परिसरातील केशर आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

कळवणमध्येही गारपीट

कळवण : कळवण शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी गारांसह तासभर संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कळवण शहरातील रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. कांदा, डाळिंब, तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ICSE परीक्षेत मुंबईची आद्या देशात पहिली

बारावीत आद्या माद्दी देशात पहिली

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएसई) या शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालांमध्ये मुंबईकर मुलींनी आपला ठसा उमटवला आहे. शुक्रवारी हे निकाल जाहीर झाले. यामध्ये बारावीच्या परीक्षेत मुंबईतील लिलावतीबाई पोद्दार हायस्कूलची आद्या माद्दी ९९.७५ टक्के गुण मिळवून देशात पहिली असून जुहूच्या जमनालाल नरसी स्कूलची मानसी पुग्गल ही ९९.५० टक्के मिळवून देशात दुसरी आहे. दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या हिरानंदानी शाळा, पवई येथील ईशा सेठीने ९९ टक्के मिळवत मुलींमध्ये पहिले येण्याचा मान पटकावला आहे. ईशा देशात दुसरी आली आहे. तिच्यासोबत मुंबईच्याच मनन शाहने दहावीच्या परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. या दोघांसोबत लखनऊ आणि बंगळुरूच्या विद्यार्थ्यांनी देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

आयसीएसईमध्ये दहावीत देशात प्रथम येण्याचा मान ओडिशाच्या अभिनीत परिच्छा या विद्यार्थ्याला मिळाला आहे. त्याला ९९.२ टक्के गुण मिळाले आहेत. दहावीत तिसऱ्या स्थानावर दहा विद्यार्थी आहेत. आयसीएसई(दहावी)चा एकूण निकाल ९८.५० टक्के तर आयएसई(बारावी)चा ९६.४६ टक्के लागला आहे. आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षेत पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील ८ विद्यार्थी देशात झळकले आहेत. तर बारावीतील चार मुलांचा समावेश आहे.

आयसीएसीईच्या परीक्षेला देशभरात १ लाख ६८ हजार ५९१ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ७५ हजार मुली होत्या. यामध्ये दक्षिण विभागाचा निकाल सर्वाधिक आहे. दहावीमध्ये देशातील ९८.५ आणि बारावीमध्ये ९६.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेन यावेळी १२ दिवस अगोदर हा निकाल जाहीर झाला आहे.

दहावीत राज्यातील गुणवंत

ईशा सेठी (मुंबई) ९९.००

मनन शाह (मुंबई) ९९.००

इशिका वर्मा (ठाणे) ९८.०८

किश्तू झुनझूनवाला (मुंबई) ९८.८

आदित्य अयंगार (पुणे) ९८.८

प्रियांका बगाडे (ठाणे) ९८.८

पुरवी श्रीवास्तव (ठाणे) ९८.८

महाराष्ट्रातील गुणवत्ताधारक

सिद्धार्थ त्रिपाठी (मुंबई) ९८.८

पार्थ संघवी (मुंबई) ९८.६

मिहीर डिंगणकर (ठाणे) ९८.६

आदित्य अग्रवाल (ठाणे) ९८.६

अनेरी मोदी (मुंबई) ९८.६

बारावीतील गुणवंत

आद्या माद्दी (मुंबई) ९९.७५

मानसी पुग्गल (मुंबई) ९९.५०

अत्रेवो पाल (मुंबई) ९८.७५

मयांक वैद्य (ठाणे) ९८.७५

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्य रेल्वेचे कर्मचारी देणार लातूरला पाणी

उद्या रवाना होणार ‘वॉटर एक्स्प्रेस’

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

मराठवाड्यातील लातूरसह काही जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील कर्मचाऱ्यांनी लातूर जिल्ह्यात स्वखर्चाने पाणी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबद या जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या अभावाने भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळामुळे अनेकांनी स्थलांतर केले, तर पशू-पक्षी चारा-पाण्याशिवाय मृत्युमुखी पडत आहेत.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनेही या भागासाठी रेल्वेने पाणी पाठविण्याची व्यवस्था केली. तेथील भयावह स्थितीच्या बातम्या वर्तमानपत्र आणि चॅनेल्सवर पाहून मध्य रेल्वेच्या नागपुरातील कर्मचाऱ्यांना आपणही आपल्या या बांधवांसाठी काही करावे असे वाटले आणि या वाटण्यातूनच मराठवाड्यात पाणी पाठविण्याच्या उपक्रमाने मूर्त रूप घेतले. तुषार विघ्ने, रितीन खटेकर, अनिल पुराणिक आणि प्रशांत गोलाईत या चौघांच्या मनात ही संकल्पना आली आणि हा उपक्रम साकारला. आता दर शनिवारी १५ हजार लिटर पाणी हे कर्मचारी लातूरला पाठविणार आहेत. पाणी पाठविण्याचा हा उपक्रम ८ शनिवार चालणार आहे. या पाण्याची पहिली खेप शनिवारी ७ मे रोजी दुपारी ३ वाजता ११४०३ नागपूर-कोल्हापूर या गाडीने रवाना होणार आहे. नागपूर मंडळाचे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार गुप्ता, एडीआरएम डॉ. जयदीप गुप्ता व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेच्या स्काऊट- गाइडच्या विद्यार्थ्यांनी पाणी गाडीत चढविण्याची जबाबदारी घेतली आहे.

हारूनभाई, भूसमुद्र, नंदगाव या लातूरच्या ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात हे पाणी वितरित केले जाईल. मराठवाड्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. त्यात आम्ही आमचा खारीचा वाट उचलत असल्याचे या उपक्रमाचे एक आधारस्तंभ तुषार विघ्ने यांनी ‘मटा’ला सांगितले. आधी हे पाणी कॅनद्वारे पाठविण्यात येणार होते मात्र कॅन परत आणण्याचीही व्यवस्था करावी लागली असती त्यामुळे आता पाऊचद्वारे हे पाणी पाठवण्यात येईल. दर शनिवारी पाणी पाऊचच्या १ हजार बॅग्ज पाठविण्यात येतील. पाण्याचा तसेच पाणी वाहतुकीचा खर्चही हे कर्मचारी स्वतःच करणार आहेत. या उपक्रमाबाबत कळताच अनेकांनी आपल्या योगदानासाठी पुढाकार घेतला आहे. दुसऱ्या आठवड्याचे पाणी मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे दिले जाणार आहे. याशिवाय शहरातील काही शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक संस्थाही पुढे आल्या आहेत.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान मोदींबद्दल काय बोलला विराट?

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचा सध्याचा धडाडीचा फलंदाज विराट कोहली यांच्या भेटीचा योग आलेला नसला तरी हे दोघेही एकमेकांचे ‘फॅन’ आहेत. विराटच्या फलंदाजीचं मोदींनी अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून मुक्तकंठाने कौतुक केलेलं आहे आणि विराटनेही मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना खास शुभेच्छा दिल्या होत्या. म्हणूनच वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात विराटला मोदींबद्दल एका शब्दात उत्तर देण्यास सांगितलं असता त्यानेही नेमकं उत्तर देऊन दाद मिळवली.

नरेंद्र मोदी क्रिकेटचे चाहते आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये बसून अनेक सामन्यांचा आनंदही घेतला आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकपवेळी भारतीय संघाला प्रोत्साहन देणारे अनेक ट्विट्स त्यांनी केले. या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली होती. त्यामुळे मोदींनी विराटच्या खेळीचं कौतुक करणारे खास ट्विट्सही केले. तोच धागा पकडत सीएनएनच्या मल्लिका कपूर यांनी एका मुलाखतीत विराटला मोदींबाबत प्रश्न विचारून बोलतं केलं.

पंतप्रधान मोदींच्या व्यक्तिमत्वाबाबत एका शब्दात सांगायचं झाल्यास काय सांगशील, असा प्रश्न विचारला असता विराटने लगेचच ‘आत्मविश्वास’ असं उत्तर दिलं. मोदींबाबत विचार करतो तेव्हा मला फक्त आणि फक्त आत्मविश्वास दिसतो, असे विराटने नमूद केले. विशेष म्हणजे मोदींबद्दल असा विचार करणारा विराटही क्रिकेटमध्ये आत्मविश्वासाच्या बळावरच यशाच्या अनेक पायऱ्या सर करत आहे. खुद्द विराटनेच अनेकदा ही बाब बोलून दाखवली आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इटलीने ‘त्यांना’ गुन्हेगार ठरवलं, तर आम्ही काय करणार: मोदी

मटा ऑनलाइन वृत्त । होसूर (तामिळनाडू)

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी प्रथमच मतप्रदर्शन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाव न घेता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. ‘इटलीच्या लोकांनीच ‘त्यांना’ गुन्हेगार ठरवलं आहे तर आमचं सरकार तरी काय करणार?’, अशा खोचक शब्दांत मोदींनी सोनियांना टोला लगावला.

होसूर येथे प्रचार सभेत बोलताना मोदींनी ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणावर स्पष्ट शब्दांत सरकारची भूमिका मांडली तसेच हेलिकॉप्टर खरेदीत ‘चोरी’ करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी की नको?, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी की नको?, असे प्रश्नही मोदींनी जनसमुदायाला विचारले.

‘मी इटली देश पाहिलेला नाही. इटलीत मी कुणाला ओळखतही नाही आणि मी कुणाला भेटलोही नाही. तरीही इटलीतल्या लोकांनी ‘त्यांना’ गुन्हेगार ठरवलं आहे. त्याला आम्ही तरी काय करणार?’, अशी टोलेबाजी करत मोदींनी एकप्रकारे काँग्रेसकडून होत असलेले आरोपच फेटाळून लावले.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिलायन्स जिओचे अनलिमिटेड ‘४जी’ इंटरनेट सुरु

reliance-jio

reliance-jio
नवी दिल्ली – सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘रिलायन्स जियो’ने त्यांची बहुप्रतिक्षित ‘४जी’ इंटरनेट सुविधा चाचणी स्वरुपात खुली केली असून याअंतर्गत पहिल्या तीन महिन्यांसाठी अनलिमिटेड ‘४जी’ इंटरनेट आणि फोन कॉल्सची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर ‘जियो प्‍ले’, ‘जियो ऑन डिमांड’, ‘जियो मॅग’, ‘जियो बीट्स’ आणि ‘जियो ड्राइव्ह’ या त्यांच्या अन्य सुविधादेखील वापरकर्त्यास मोफत वापरता येणार आहेत.

पण यासाठी कंपनीकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. रिलायन्सच्या या मोफत ‘४जी’ इंटरनेट सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांची पूर्तता होणे गरजेचे आहे. रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांकडून इन्व्हिटेशन मिळाल्यावरच ‘जियो ४जी’ सीमकार्ड मिळेल, ही यातील पहिली अट आहे. जास्तीत जास्त दहा जणांना रिलायन्सचा कर्मचारी इन्व्हाईट करू शकतो. इन्व्हिटेशन मिळाल्यावर २०० रुपये भरून हे सीमकार्ड प्राप्त होईल. दुसरी अट म्हणजे, या सीमकार्डच्या वापरासाठी रिलायन्सचा ‘लाईफ’ हा स्मार्टफोन खरेदी करणे गरजेचे आहे. हा फोन रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये विकत घेता येईल. ५५९९ पासून १९४९९ रुपयांपर्यंतच्या विविध मॉडेल्समध्ये हा फोन उपलब्ध आहे.

The post रिलायन्स जिओचे अनलिमिटेड ‘४जी’ इंटरनेट सुरु appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

सोनीचा एक्सपीरिया एक्स परफॉर्मन्स लॉन्च

sony

sony
मुंबई : सोनी ही जपानी कंपनी स्मार्टफोन्समध्ये नवनवे प्रयोग करण्यासाठी ओळखली जाते. नुकतेच सोनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये एक्सपीरिया एक्स परफॉर्मन्स सीरीजचे तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. या तिन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स एकसारखेच आहेत.

काय आहेत एक्सपीरिया एक्स परफॉर्मन्स स्मार्टफोनचे फीचर्स :

यात ५ इंचाचा एचडी ट्रायल्युमिनस डिस्प्ले ज्याचे रिझॉल्युशन १०८० x १९२० पिक्सेलचे आहे. यात अँड्रॉईड ६.० मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले असून प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० SoCचा आहे. यात मल्टिटास्किंगसाठी ३ जीबी रॅम देण्यात आले आहेत. यात Exmor RS सेन्सर असलेला २३ मेगापिक्सेलचा रिअर आणि १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एक्सपीरिया एक्स परफॉर्मन्स स्मार्टफोन्समध्ये ३२ जीबीच्या स्टोरेजची सुविधा दिली असून, मायक्रो-एसडी कार्डच्या सहाय्याने २०० जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधाही आहे.

The post सोनीचा एक्सपीरिया एक्स परफॉर्मन्स लॉन्च appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.