नक्षलवाद्यांचा छत्तीसगडमध्ये आयटीबीपी कॅम्पवर हल्ला

naxlite

naxlite
रायपूर – आज पहाटे नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात इंडो तिबेटीयन सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) कॅम्पवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आयटीबीपीच्या ४१ व्या बटालियनवर रॉकेट व बंदुकीच्या सहाय्याने हल्ला केला. कोंडागाव जिल्ह्यातील राणापाल भागात हा हल्ला झाला असून, सुमारे १०० नक्षलवाद्यांनी तिन्ही बाजूने कॅम्पला घेरून हल्ला केला. मध्यरात्री साडेबारापासून पहाटे तीनपर्यंत गोळीबार सुरु होती. नक्षलवाद्यांनी कॅम्पच्या दिशेन चार रॉकेटही डागले. आयटीबीपीच्या जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने सुमारे ६०० राऊंड फायर झाले आहेत. या हल्ल्यानंतर नक्षलवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले.

The post नक्षलवाद्यांचा छत्तीसगडमध्ये आयटीबीपी कॅम्पवर हल्ला appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

सहा महिन्यात खडसेंची चौकशी

eknath-khadse

eknath-khadse
मुंबई – सेवा निवृत्त न्यायाधीशांकडून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात येणार असून, संभाव्य न्यायाधीशांच्या नावाची चाचपणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू आहे. चौकशीची ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी ‘इन्क्वायरी ऑफ कमिशन ऍक्‍ट’नुसार आयोग स्थापण्याच्या फंदात राज्य सरकार पडणार नसल्याची माहिती भाजपच्या जेष्ठ मंत्र्याने दिली.

खडसे यांच्यावर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, कल्याण येथील जमीन व्यवहारासाठी गजमल पाटील यांनी केलेली ३० कोटी रुपयांच्या लाचेची मागणी, तसेच पुण्यातील भोसरी “एमआयडीसी‘च्या जमिनीचे हस्तांतर असे आरोप करण्यात आल्यामुळे खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. भाजपतील काही मंडळी खडसे यांच्या मागे लागल्याची जोरादर चर्चा राजकीय वर्तुळात होती. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते. खडसे यांची चौकशी लांबण्यासाठी ‘इन्क्वायरी ऑफ कमिशन ऍक्‍ट’नुसार चौकशी होणार असल्याची चर्चाही होती. यामुळे चौकशीचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत ठेवून खडसे यांच्यावर टांगती तलवार ठेवण्यात येणार असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे होते.

राज्यातील दहा महापालिका, २६ जिल्हा परिषदा आणि त्यातंर्गत येणाऱ्या पंचायत समित्या, तसेच नगर परिषदांच्या निवडणुका येत्या ऑक्‍टोबरपासून होणार आहेत. खडसे यांचे उपद्रवमूल्य लक्षात घेता त्यांना अधिक डिवचणे योग्य होणार नसल्याचे, भाजपच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. यासाठी चौकशीची प्रक्रिया लवकर पूर्ण करून खडसे यांच्यावरील आरोपांना पूर्णविराम देण्याची काही नेत्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर ‘इन्क्वायरी ऑफ कमिशन ऍक्‍ट’च्या फंदात न पडता निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करून काही महिन्यांतच हा विषय संपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर घेतल्याची माहिती ज्येष्ठ मंत्र्याने दिली. यासाठी काही दिवसांतच संबंधित न्यायाधीशांचे नाव जाहीर करून त्याबाबतचे आदेश काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

The post सहा महिन्यात खडसेंची चौकशी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

११ जुलैपासून रेल्वे कर्मचारी बेमुदत संपावर!

indian-railway

indian-railway
नवी दिल्ली- रेल्वे कामगार संघटना येत्या ११ जुलैपासून नवीन पेन्शन योजना आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संपावर जाणार असून ११ जुलैला सकाळी ६ वा.पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची नोटीस आम्ही रेल्वे व्यवस्थापनाला देऊ, अशी माहिती ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस एस. गोपाल मिश्रा यांनी दिली.

आम्ही आमच्या मागण्या रेल्वे प्रशासनाला सहा महिन्यांपूर्वी सादर केल्या होत्या. परंतु सरकारचा आमच्याकडे पाहण्याच्या तुच्छतेच्या दृष्टिकोनामुळे संप अटळ बनला आहे, असा दावा त्यांनी केला. रेल्वेचे १३ लाख कर्मचारी असून त्यांच्या संपामुळे देशभरातील रेल्वे सेवा ठप्प होईल. त्याचा फटका तमाम देशवासीयांना बसणार आहे. वरील मागण्यांशिवाय रेल्वेतील रिक्त पदे भरण्याची मागणीही युनियन्सने केली आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन्स संघटनेनेही या संपाला पाठिंबा दिला आहे.

The post ११ जुलैपासून रेल्वे कर्मचारी बेमुदत संपावर! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

मध्‍यरात्री एक वाजेपर्यंत फडणवीसांनी घेतली मंत्र्यांची शाळा

cm

cm
मुंबई – भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदावरुन राजीनाम्याचे पडसाद उमटू लागले असून मंत्र्यांमध्ये असलेला संभ्रम नाराजीच्या स्वरूपात बाहेर येऊ लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री एक वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर आपल्या सगळ्या मंत्र्यांची ‘शाळा’ घेतली. तुम्ही सर्वांनी खडसे प्रकरणामुळे फार काळजीपूर्वक काम केले पाहिजे. सचिव व अधिकाऱ्यांच्या सूचना डावलून फाईल्स मंजूर करता कामा नये. याचा मोठा फटका बसू शकतो, अशा शब्दात कानउघाडणीही केल्यामुळे या ‘शाळे’तून बाहेर पडल्यानंतर बहुतांश मंत्र्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली.

पंधरा वर्षानंतर युतीचा सत्ता राज्यातील जनतेला भ्रष्टाचार निर्मूलनाचा शब्द देऊन आल्यामुळे सरकारच्या कामगिरीकडे सर्वांचे बारीक लक्ष आहे. मात्र अवघ्या दीड वर्षात भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे खडसेंना राजीनामा देण्याची वेळ आली. यामुळे भाजपची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे आता फडणवीस ताकही फुंकून पिण्याच्या भूमिकेत आहेत. सचिव व अधिकाऱ्यांनी एखाद्या फाईलवर निगेटीव शेरा मारला असेल तर तो पोझिटीव करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांनी धडपड करू नये. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून किंवा त्यांना अंधारातून ठेवून काही निर्णय घेतल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात काय झाले होते, याची आपल्यासमोर असंख्य उदाहरणे आहेत, असे फडणवीस यांनी मंत्र्यांना या बैठकीत सुनावल्याची माहिती आहे.

The post मध्‍यरात्री एक वाजेपर्यंत फडणवीसांनी घेतली मंत्र्यांची शाळा appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

कपिल शर्माचा शो सुमोना सोडणार

sumona-chakarvarti

sumona-chakarvarti
‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉक्टर मशहून गुलाटीची (सुनील ग्रोवर) मुलगी सरलाची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती हा शो सोडणार असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार निर्मात्यांवर सुमोना नाराज असून शोमध्ये कप्पूच्या (कपिल शर्मा) लव्ह इंटरेस्टच्या रुपात एक नवीन कॅरेक्टर आणले जाणार आहे. सुमोनाने निर्मात्यांना मानधन वाढवण्याससुध्दा सांगितले होते. त्यामुळे हा वाद सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात सुमोनाने बोलण्यास नकार दिला आहे.

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ शोदरम्यान कपिल आणि सुमोनाची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. लोक सुमोनाला कपिलच्या ऑनस्क्रिन पत्नीच्या रुपात ओळखायला लागले होते. ती सोनी टीव्हीवर कपिलच्या लव्ह इंटरेस्टच्या रुपात परतली आहे. आजही लोक या जोडीला पसंत करतात. परंतु आता ही जोडी जास्त दिवस स्मॉल स्क्रिनवर दिसणार नाही असे वाटते आहे.

The post कपिल शर्माचा शो सुमोना सोडणार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

मालवेअर इन्फेक्शनची पैदास पाकिस्तानात

malware

malware
सिंगापूर – आशिया-प्रशांत देशांमध्ये १० हजार संगणकांपैकी कमीतकमी ४ संगणक मालवेअरने संक्रमित असून मायक्रोसॉफ्टद्वारे करण्यात आलेल्या एका अध्ययनात हा निष्कर्ष आढळला असून नुकत्याच जारी झालेल्या या निर्देशांकात पाकिस्तान अग्रस्थानी तर भारत आठव्या स्थानी आहे.

सर्वाधिक धोकादायक मालवेअरची ओळख या निर्देशांकात पटविण्यात आली असून ज्यात एक गॅमाऱयू आहे हा मॅलिशस कॉम्प्युटर वर्म आहे,जो सामान्यपणे सोशल इंजिनियरिंगद्वारे फैलावतो. यानंतर स्कीया आणि पील्स असून ते ट्रोजन आहेत, त्यांना इन्स्टॉल केले जावे यासाठी ते अतिशय साधारण स्वरुपाचे भासतात. वैयक्तिक माहिती हे मालवेअर चोरू शकतात. अधिक मालवेअर डाउनलोड करू शकतात असे मायक्रोसॉफ्ट आशियाचे क्षेत्रीय संचालक केशव ढाकड यांनी सांगितले. हा निष्कर्ष मायक्रोसॉफ्ट मालवेअर प्रोटेक्शन सेंटरमधून मिळालेली माहिती आणि मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी इंटेलिजेन्स रिपोर्टवर आधारित आहे.

The post मालवेअर इन्फेक्शनची पैदास पाकिस्तानात appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

पंतप्रधान मोदींना महिला तहसीलदारचा अजब सल्ला

collector

collector
रतलाम – पुन्हा एकदा आपल्या फेसबुक पोस्टबाबत अनेकदा वादात सापडणा-या तहसीलदार अमिता सिंग चर्चेत आल्या आहेत. आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एकीकडे कौतुक केले. तर दुसरीकडे त्यांना ‘राजीव गांधी आत्महत्या योजना’ सुरू करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

त्यांना आपल्या फेसबुक वॉलवरून यानंतर वाढलेल्या वादामुळे पोस्ट हटवून माफी मागावी लागली. आपल्या व्हॉट्सऍपवर हा मॅसेज आला होता, जो आपण फेसबुकवर पोस्ट केला असे महिला तहसीलदाराचे म्हणणे आहे. पंतप्रधान अफगाणिस्तानात गेले, तेथे मुसलमानांनी भारताचे झेंडे घेऊन रस्त्यावर ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. यामुळे पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी ‘राजीव गांधी आत्महत्या योजना’ सुरू करावी, जेणेकरून धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेसी विचारवाले असे वृत्त ऐकून आत्महत्या करू शकतील असे त्यानी फेसबुक वॉलवर लिहिले होते. यानंतर महिला तहसीलदारच्या या पोस्टला सोशल मीडियावर जोरदार विरोध झाला. कोणालाही वाईट वाटू नये यासाठी माफी मागितल्याचे स्पष्टीकरण महिला अधिका-याने दिले.

The post पंतप्रधान मोदींना महिला तहसीलदारचा अजब सल्ला appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

शिवसेनेला खुल्या मैदानात उत्तर देऊ!: दानवे

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

‘देशात निजामाच्या बापाचं राज्य आहे,’ ही शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. ‘शिवसेनेच्या या टीकेला चार भिंतीत नाही तर खुल्या मैदानात उत्तर देऊ,’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. मोदींच्या परदेश दौऱ्यांचीही राऊत यांनी खिल्ली उडवली होती. ‘देशात अच्छे दिन फक्त एकनाथ खडसे आणि बाकीच्या दोन-पाच लोकांना आले आहेत. केंद्रात आणि राज्यात सध्या निजामाच्या बापाचं राज्य आहे. शिवसेनेला त्यांच्याशी लढायचं आहे,’ असं राऊत म्हणाले होते.

राऊत यांच्या या टीकेबद्दल दानवे यांना विचारले असता त्यांनी यावर मीडियाकडं काहीही बोलणार नाही, असं सांगितलं. चार भिंतीत नाही तर खुल्या मैदानात शिवसेनेला उत्तर देऊ, असं ते म्हणाले. दानवे यांचा हा इशारा मुंबई महापालिका निवडणुकांकडं असल्याचं बोललं जात आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई: जलवाहिनी फुटल्याने असल्फात हाहाकार

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

घाटकोपरमधील असल्फा गावात जलवाहिनी फुटल्याने बुधवारी रात्री हाहाकार उडाला. स्फोटासारखा मोठा आवाज होऊन ४० ते ५० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले आणि लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. एकीकडे महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई असताना असल्फा व्हिलेजमध्ये मात्र या दुर्घटनेमुळे पुरासारखी स्थिती निर्माण झाली.

तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जलवाहिनी पूर्ववत करण्यात यश आलं असलं तरी या संपूर्ण प्रकारामुळे असल्फा व्हिलेजमध्ये राहणाऱ्या लोकांना रात्र मात्र जागून काढावी लागली. दरम्यान, दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला या भागातील पाणीपुरवठा सकाळी सात वाजता पूर्ववत करण्यात आला. आज नळांना पाणी आलं असलं तरी पुढचे तीन ते चार दिवस या भागात पाणीकपात वा कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

चाळीत गुडघाभर पाणी, गाड्या गेल्या वाहून

रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. जलवाहिनी फुटल्यानंतर एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे पाण्याचा मोठा लोंढा जवळपासच्या झोपड्यांमध्ये शिरला. त्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला. चाळींमध्ये गुडघाभर पाणी भरले होते. चाळींमध्ये अनेकजण अडकले शिवाय पाण्याच्या लोंढ्यासोबत अनेक कार व बाइक्सही वाहून गेल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पालिकेची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी युद्धपातळीवर मदतकार्य करत चाळींमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले तसेच तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले.

दरम्यान, ज्या चाळींमध्ये पाणी शिरले त्या कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीस पालिका जबाबदार असून पालिकेने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सून काळी होती म्हणून जिवंत जाळून मारले!

मटा ऑनलाइन वृत्त । वीरभूम

आपली सून काळी आहे. आपल्या मुलाला तिच्यापेक्षा चांगली दिसणारी व गोरी मुलगी मिळावी म्हणून सासरच्यांनी मुलाच्या मदतीनं सूनेला जिवंत पेटवून तिची हत्या केली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पश्चिम बंगालच्या वीरभूम इथं घडली आहे.

पीडित सोमेरा बीबी (२२) हिनं मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या साक्षीतून हे भयंकर वास्तव पुढं आलं आहे. नासीर यानं तीन वर्षांपूर्वी १ लाख रोख आणि काही जमिनीच्या बदल्यात सोमेराशी लग्न केलं होतं. पण सोमेराचा रंग काळा असल्यानं नासीर व त्याचं कुटुंब तिला सतत त्रास देत असे. आमच्या मुलाला तुझ्यापेक्षा चांगली, गोरी मुलगी हवी होती. तू आमच्या घरात नको. इथं राहायचं असेल तर माहेरच्यांकडून पैसे आण, असा तगादा सोमेराकडं लावला जाई. सोमेराच्या आई-वडिलांनी मुलीसाठी अनेकदा पैशाच्या मागण्या मान्य केल्या. त्यासाठी स्वत:ची जमीनही विकली. पण, सोमेराच्या सासरकडून मागण्या सुरूच होत्या.

सहा महिन्यांपूर्वीच सोमेराच्या सासरकडच्यांनी घर बांधण्यासाठी तिच्याकडं २ लाख रुपयांची मागणी केली. मात्र, आता ते शक्य नसल्यानं सोमेरानं त्यांना विरोध केला. त्यामुळं संतापलेल्या नासीर, त्याची आई आणि तीन भावांनी मिळून तिला एका खोलीत कोंडले आणि अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. सोमेराच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावत आले, तेव्हा तिची सासू व नवरा तिथून पळून गेले होते. शेजाऱ्यांनी जखमी सोमेराला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, ती बरीच भाजली होती. अखेर आज सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी नासीर शेख व त्याचे भाऊ फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट